Adani Power Share Price | अदानी ग्रुपचा सर्वात स्वस्त शेअर! तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, मोठी बातमी लीक होताच खरेदी प्रचंड वाढली

Adani Power Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत चढ उतार पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स 298.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र दिवसा हा स्टॉक 3 टक्के घसरणीसह 283.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार बुधवारी एका ब्लॉक डील अंतर्गत अदानी पॉवर कंपनीचे सुमारे 31 कोटी शेअर्स शेअर बाजारात विकले गेले होते. हे प्रमाण अदानी पॉवर कंपनीच्या एकूण भाग भांडवलच्या 8.1 टक्के आहे. आज गुरूवार दिनांक 17 ऑगस्ट 2023 रोजी अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स 1.75 टक्के वाढीसह 284.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
बुधवारी अदानी पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये 9,000 कोटी रुपयांची ब्लॉक डील झाली. ही डील अमेरिकन इन्व्हेस्टमेंट फर्म जीक्यूजी पार्टनर्सने केली आहे. या गुंतवणूक कंपनीने 9000 कोटी रुपये गुंतवणूक करून अदानी पॉवर कंपनीचे 8.1 टक्के भाग भांडवल खरेदी केले आहे. जीक्यूजी पार्टनर्सने अदानी पॉवर कंपनीचे तब्बल 31 कोटी शेअर्स खरेदी केले आहे.
भारतीय शेअर बाजारातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा सौदा आहे. या डीलचे एकूण मूल्य 9,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. जून 2023 तिमाहीच्या शेअरहोल्डिंग डेटानुसार अदानी पॉवर कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे 74.97 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत.
अदानी समुहाच्या मालकीच्या सर्व सूचीबद्ध कंपन्यांमध्ये अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स सर्वात स्वस्त आहेत. गौतम अदानी यांच्या मालकीच्या 7 कंपन्या शेअर बाजारात सूचीबद्ध आहेत. अदानी एंटरप्रायझेस, अदानी ट्रान्समिशन, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी टोटल गॅस, अदानी पोर्ट्स, अदानी विल्मार, अदानी पॉवर या सात कंपन्या शेअर बाजारात व्यापार करतात. जून 2023 तिमाहीत अदानी पॉवर कंपनीने मागील वर्षीच्या जून तिमाहीच्या तुलनेत 83.3 टक्के वाढीसह 8,759.42 कोटी निव्वळ नफा कमावला आहे.
मागील वर्षी जून तिमाहीत आदमी पॉवर कंपनीने 4,779,86 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. जून तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न वाढून 18,109.01 कोटी रुपयेवर पोहचले आहे. तर मागील वर्षी जून तिमाहीत कंपनीने 15,509 कोटी रुपये कमाई केली होती. मागील वर्षीच्या जून तिमाहीच्या तुलनेत अदानी पॉवर कंपनीचा खर्च 9,642.80 कोटी रुपये वरून कमी होऊन 9,309.39 कोटीवर आला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Adani Power Share Price today on 17 August 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं