Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL

Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर लिमिटेड कंपनीने दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर (NSE: AWL) केले आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत अदानी विल्मर लिमिटेड कंपनीचा नफा ३११.०२ कोटी रुपये झाला आहे. मागील आर्थिक वर्ष 2023-24 च्या याच तिमाहीत अदानी विल्मर लिमिटेड कंपनीला 130.73 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. या कालावधीत कंपनीचे एकूण उत्पन्न वाढून 14,565.30 कोटी रुपये झाले आहे, जे गेल्या वर्षी याच तिमाहीत 12,331 कोटी रुपये होते. (अदानी विल्मर लिमिटेड कंपनी अंश)
अदानी विल्मर शेअरची सध्याची स्थिती
गुरुवार 24 ऑक्टोबर रोजी अदानी विल्मर लिमिटेड कंपनी शेअर 6.05 टक्के वाढून 337.50 रुपयांवर पोहोचला होता. शुक्रवार 25 ऑक्टोबर रोजी हा शेअर 4.67 टक्के घसरून 324.40 रुपयांवर पोहोचला होता. या कंपनीचे एकूण मार्केट कॅप 44,138 कोटी रुपये आहे.
स्ट्रीट्स ब्रोकरेज फर्म – टार्गेट प्राईस
स्ट्रीट्स ब्रोकरेज फर्मचे फंड मॅनेजर कुणाल रंभिया यांनी अदानी विल्मर शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. स्ट्रीट्स ब्रोकरेज फर्मने या शेअरसाठी ४०० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच ३२० रुपये स्टॉप लॉस ठेवण्याचा सल्ला दिला आहे. अदानी विल्मर शेअर शॉर्ट टर्ममध्ये ४०० रुपये टार्गेट प्राईस गाठू शकतो असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
अदानी टोटल गॅस
अदानी टोटल गॅस लिमिटेड कंपनीला दुसऱ्या तिमाहीत १८६ कोटी रुपयांचा नफा झाला आहे, जो मागील तिमाहीत १७२ कोटी रुपये इतका होता. अदानी टोटल गॅस लिमिटेड कंपनीचा महसूल तिमाही आधारावर 1240 कोटी रुपयांवरून 1320 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. दुसऱ्या तिमाहीत अदानी टोटल गॅस लिमिटेड कंपनीचा एबिटा 305 कोटी रुपये होता, जो मागील तिमाहीत 296 कोटी रुपये इतका होता. एबिटा मार्जिन २३.९% वरून २३.२ टक्क्यांवर आली आहे.
अदानी टोटल गॅस शेअर
अदानी टोटल गॅस लिमिटेड कंपनी शेअर 7.83% वाढून 755.30 रुपयांवर पोहोचला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 37.22% परतावा दिला आहे. तसेच मागील ५ वर्षात या शेअरने 109.83% परतावा दिला आहे. सध्या या कंपनीचे एकूण मार्केट कॅप 83,063 कोटी रुपये आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Adani Wilmar Share Price 25 October 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं