ADF Foods Share Price | 700% परतावा देणाऱ्या ADF फूड्स शेअरने पुन्हा 1 महिन्यात 45% परतावा दिला, आता स्टॉक स्प्लिटचा फायदा

ADF Foods Share Price | ADF फूड्स या कंपनीने कोविड नंतरच्या रॅलीमध्ये आपल्या गुंतवणूकदारांना बक्कळ नफा मिळवून दिला होता. कोविडनंतर ADF फूड्स कंपनीचे शेअर्स 140 रुपयेवरून वाढून 1090 रुपये पर्यंत वाढले होते. आता या कंपनीने एक मोठी घोषणा केली आहे. ADF फूड्स कंपनी आपले शेअर्स विभाजित करणार आहे.
ADF फूड्स कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, ADF फूड्स कंपनीने आपले शेअर्स 5 तुकड्यामध्ये विभाजित करण्याची घोषणा केली आहे. या स्टॉक स्प्लिटसाठी कंपनीने रेकॉर्ड डेट देखील निश्चित केली आहे. शुक्रवार दिनांक 25 ऑगस्ट 2023 रोजी ADF फूड्स कंपनीचे शेअर्स 0.51 टक्के वाढीसह 1,055.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
स्टॉक स्प्लिट रेकॉर्ड डेट तपशील :
ADF फूड्स कंपनीने स्टॉक स्प्लिटची पात्रता निश्चित करण्यासाठी रेकॉर्ड तारीख जाहीर केली आहे. या कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, ADF फूड्स कंपनी आपले 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर्स 5 तुकड्यामध्ये विभाजित करणार आहे. स्टॉक स्प्लिटनंतर ADF फूड्स कंपनीच्या शेअरचे दर्शनी मूल्य 2 रुपये होईल. ADF फूड्स कंपनीने स्टॉक स्प्लिटची पात्रता निश्चित करण्यासाठी 11 सप्टेंबर 2023 हा दिवस रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केला आहे. म्हणजेच रेकॉर्ड तारीखला ज्या गुंतवणूकदारांचे नाव कंपनीच्या रेकॉर्ड बुकमध्ये सामील असेल, त्याना स्टॉक स्प्लिटचा लाभ दिला जाईल.
शेअरची कामगिरी :
अवघ्या एका महिन्यात ADF फूड्स कंपनीच्या शेअरची किंमत 735 रुपयेवरून वाढून 1055 रुपयेवर गेली आहे. एका महिन्यापूर्वी ज्या लोकानी या कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 45 टक्के वाढले आहे. ज्या लोकांनी एक वर्षापूर्वी ADF फूड्स कंपनीच्या शेअरमध्ये पैसे लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 50 टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहे. कोविड-19 नंतर आतापर्यंत ADF फूड्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 700 टक्के परतावा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | ADF Foods Share price today on 25 August 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं