Aditya Vision Share Price | कुबेर कृपा झाली! अवघ्या 3 वर्षात या शेअरने 10000 टक्के परतावा दिला, गुंतणूकदार करोडपती झाले

Aditya Vision Share Price | आदित्य व्हिजन या मल्टी-ब्रँड ग्राहक इलेक्ट्रॉनिक चेन कंपनीच्या शेअरने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. मागील 3 वर्षात आदित्य व्हिजन कंपनीचे शेअर्स 26 रुपयेवरून वाढून 2700 रुपये किमतीवर पोहचले आहेत. या काळात आदित्य व्हिजन कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 10000 टक्के परतावा कमावून दिला आहे.
आदित्य व्हिजन कंपनी 1999 साली बिहारमधील पटना याठिकाणी आपले पहिले शोरूम सुरू केले होते. आता या कंपनीचे देशभरात झारखंड, बिहार आणि उत्तर प्रदेश राज्यात 100 पेक्षा जास्त शोरूम आहेत. आज शुक्रवार दिनांक 20 ऑक्टोबर 2023 रोजी आदित्य व्हिजन कंपनीचे शेअर्स 0.35 टक्के वाढीसह 2,714.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
11 डिसेंबर 2020 रोजी आदित्य व्हिजन कंपनीचे शेअर्स 26.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 19 ऑक्टोबर 2023 रोजी आदित्य व्हिजन कंपनीचे शेअर्स 2699 रुपये किमतीवर पोहोचले होते. आदित्य व्हिजन कंपनीच्या शेअर्सने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 10046 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 11 डिसेंबर 2020 रोजी आदित्य व्हिजन कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे एकूण मूल्य 1.01 कोटी रुपये झाले असते.
मागील 6 महिन्यांत आदित्य व्हिजन कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 90 टक्के वाढवले आहेत. आदित्य व्हिजन कंपनीचे शेअर्स 19 एप्रिल 2023 रोजी 1426.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 19 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2699 रुपये किमतीवर पोहोचले होते.
2023 या वर्षात आदित्य व्हिजन कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 76 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील वर्षत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 71 टक्क्यांनी वाढली आहे. आदित्य व्हिजन कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 2878 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 1140 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Aditya Vision Share Price NSE 20 October 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं