Aeroflex Industries IPO | मार्ग श्रीमंतीचा! पहिल्याच दिवशी 66 टक्के परतावा मिळण्याचे संकेत, एरोफ्लेक्स इंडस्ट्रीज IPO GMP ने अपेक्षा वाढल्या

Aeroflex Industries IPO | एरोफ्लेक्स इंडस्ट्रीज कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणुकदार आशिष कचोलिया यांची गुंतवणूक असलेल्या एरोफ्लेक्स इंडस्ट्रीज कंपनीच्या IPO ला दुसऱ्या दिवशी 21.10 पट अधिक बोली प्राप्त झाली आहे. एरोफ्लेक्स इंडस्ट्रीज कंपनीचा IPO मंगळवार दिनांक 22 ऑगस्ट 2023 रोजी गुंतवणुकीसाठी लाँच करण्यात आला होता.
हा IPO आज गुरुवार दिनांक 24 ऑगस्ट 2023 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला राहणार आहे. एरोफ्लेक्स इंडस्ट्रीज कंपनीने आपल्या IPO साठी शेअरची किंमत बँड 102-108 रुपये जाहीर केली आहे. सध्या या कंपनीच्या IPO ला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.
एरोफ्लेक्स इंडस्ट्रीज कंपनीच्या IPO वर दुसऱ्या दिवशी गैरसंस्थात्मक गुंतवणूकदार आणि किरकोळ गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात बोली लावली आहे. पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांनी देखील या IPO मधे मोठ्या प्रमाणात बोली लावली आहे. या तिन्ही श्रेणीमधील राखीव कोटा सध्या ओव्हरसबस्क्राइब झाला आहे.
एरोफ्लेक्स इंडस्ट्रीज कंपनीच्या IPO मध्ये किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 17.78 पट अधिक खरेदी झाला आहे. तर NII राखीव कोटा 46.42 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे. QIB चा राखीव कोटा 8.05 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. आणि किरकोळ गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 11.46 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे.
एरोफ्लेक्स इंडस्ट्रीज कंपनीच्या IPO ला पहिल्या दिवशी एकूण 6.72 पट अधिक मागणी प्राप्त झाली होती. एरोफ्लेक्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये देखील जबरदस्त कामगिरी करत आहेत. एरोफ्लेक्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 72 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. म्हणजेच जर हा स्टॉक अप्पर किमतीवर वाटप करण्यात आला, आणि ग्रे मार्केट किंमत टिकुन राहिली तर गुंतवणुकदारांना स्टॉक लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी 66.67 टक्के परतावा मिळू शकतो. आणि या कंपनीचे शेअर्स180 रुपये प्रति शेअर किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Aeroflex Industries IPO today on 24 August 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं