Ahasolar Share Price | अल्पावधीत बक्कळ पैसा! अहसोलर टेक्नॉलॉजी शेअरने एका दिवसात 30 टक्के परतावा दिला, आता खरेदी करावा?

Ahasolar Share Price | अहसोलर टेक्नॉलॉजीज कंपनीच्या IPO स्टॉकने शेअर बाजारात जबरदस्त एंट्री केली आहे. शेअरला शानदार लिस्टिंग मिळाली आहे. अहसोलर टेक्नॉलॉजी या SME कंपनीचे शेअर्स BSE इंडेक्सवर 203 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले आहेत. अहसोलर टेक्नॉलॉजी कंपनीने आपल्या IPO मध्ये जाहीर केलेल्या किंमत बंदच्या तुलनेत IPO शेअर 29.30 टक्के वाढीसह सूचीबद्ध झाला आहे.
अहसोलर टेक्नॉलॉजी कंपनीच्या IPO शेअरची किंमत बँड 157 रुपये जाहीर करण्यात आली होती. या कंपनीचे शेअर्स BSE SME या दोन्ही इंडेक्सवर सूचीबद्ध करण्यात आले आहे. शुक्रवार दिनांक 21 जुलै रोजी अहसोलर टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स पाच टक्के वाढीसह 213.15 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
IPO लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी शेअर अप्पर सर्किटमध्ये अडकला होता. जबरदस्त लिस्टिंगनंतरही अहसोलर टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी पाहायला मिळाली होती. पहिल्या ट्रेडिंग सेशनमध्ये स्टॉक 5 टक्के अप्पर सर्किटमध्ये 213.15 रुपये किमतीवर पोहचले होते. ज्या गुंतवणूकदारांनी अहसोलर टेक्नॉलॉजी कंपनीच्या IPO मध्ये पैसे लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 35.76 टक्के वाढले आहे.
अहसोलर टेक्नॉलॉजी कंपनीचा IPO सोमवार दिनांक 10 जुलै 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. अहसोलर टेक्नॉलॉजी कंपनीचा IPO 13 जुलै 2023 रोजी पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला होता. IPO सबस्क्रिप्शनच्या शेवटच्या दिवशी अहसोलर टेक्नॉलॉजीज कंपनीचे IPO शेअर्स 34.79 पट अधिक खरेदी झाले होत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Ahasolar Share Price today on 22 July 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं