Alok Industries Share Price | चिंता वाढली! शेअर 39 रुपयांवरून घसरून 25 रुपयांवर आला, स्टॉक Hold करावा की Sell?

Alok Industries Share Price | आलोक इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मात्र त्यानंतर शेअर विक्रीच्या दबावाखाली आला. आणि मागील काही महिन्यांपासून आलोक इंडस्ट्रीज स्टॉक 25-30 रुपये ट्रेडिंग रेंजमध्ये व्यवहार करत आहेत. ( आलोक इंडस्ट्रीज कंपनी अंश )
जानेवारी 2024 या महिन्यात कंपनीचे शेअर्स 39.21 रुपये या आपल्या 52 आठवड्याच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. या स्टॉकची 52 आठवड्यांची नीचांक किंमत 12.52 रुपये आहे. आज सोमवार दिनांक 13 मे 2024 रोजी आलोक इंडस्ट्रीज स्टॉक 2.12 टक्के घसरणीसह 25.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने आलोक इंडस्ट्रीज कंपनीमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. या कंपनीच्या प्रवर्तकांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज आणि जेएम फायनान्शिअल अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी सामील आहे. यांनी कंपनीचे जवळपास 75 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. जेएम फायनान्शियल अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीने आलोक इंडस्ट्रीज कंपनीचे 1,73,73,11,844 शेअर्स म्हणजेच 34.99 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. तर रिलायन्स कंपनीने आलोक इंडस्ट्रीज कंपनीचे 1,98,65,33,333 शेअर्स म्हणजेच 40.01 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.
केंद्रीय वस्तू व सेवा कर आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभाग- III, मुंबई सेंट्रलच्या सहाय्यक आयुक्तांनी आलोक इंडस्ट्रीज कंपनीला केंद्रीय वस्तू आणि सेवा कर कायदा 2017 च्या कलम 73 आणि 122 अंतर्गत 1,700,138 रुपये दंड ठोठावला आहे. आलोक इंडस्ट्रीज कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, कंपनीवर 2018-19 मधे चुकीच्या पद्धतीने इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ घेतल्याचा आरोप करून दंड ठोठावण्यात आला आहे. या आदेशाविरोधात कंपनी अपील दाखल करणार आहे. याचा कोणताही नकारात्मक परिणाम कंपनीच्या कामकाजावर होणार नाही.
यापूर्वी देखील आलोक इंडस्ट्रीज कंपनीला 22,508 रुपये दंड ठोठावण्यात आला होता. मार्च 2024 तिमाहीत आलोक इंडस्ट्रीज कंपनीचा निव्वळ तोटा किंचित कमी झाला आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार मार्च तिमाहीत कंपनीला 215.93 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला आहे. मार्च 2024 ला संपलेल्या तिमाहीत कंपनीची विक्री 6.44 टक्के घसरून 1469.31 कोटी रुपये नोंदवली गेली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Alok Industries Share Price NSE Live 13 May 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं