APL Apollo Tubes Share Price | या कंपनीचे शेअर्स तेजीत येणार, स्टॉक एक्स्पर्ट गुंतवणूक करण्याचा सल्ला देत आहेत, टार्गेट प्राईस?

APL Apollo Tubes Share Price | शेअर बाजारात अनेक मोठ्या कॅप कंपन्याचे शेअर्स सूचीबद्ध आहेत, ज्यानी आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस कमाई करून दिली आहे. असाच एक स्टॉक म्हणजे ‘एपीएल अपोलो ट्यूब्स’. मागील तीन वर्षांत ‘एपीएल अपोलो ट्यूब्स’ कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 859 टक्के नफा मिळवून दिला आहे. 27 मार्च 2020 रोजी ‘एपीएल अपोलो ट्यूब्स’ कंपनीचे शेअर्स 127.42 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनाक 28 मार्च 2023 रोजी ‘एपीएल अपोलो ट्यूब्स’ कंपनीचे शेअर्स 1.13 टक्के वाढीसह 1,203.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (APL Apollo Tubes Limited)
‘एपीएल अपोलो ट्यूब्स’ कंपनीचे शेअर्स मागील तीन वर्षांत नऊ पट अधिक मजबूत झाले आहेत. 2023 या वर्षात हा स्टॉक 10 टक्के वाढला आहे. मागील एका वर्षात ‘एपीएल अपोलो ट्यूब्स’ कंपनीचे शेअर्स 32.73 टक्के वाढले आहेत. एक वर्षभरापूर्वी ज्या लोकांनी या स्टॉकवर 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून आता 9.59 लाख रुपये झाले आहेत. 17 फेब्रुवारी 2023 रोजी ‘एपीएल अपोलो ट्यूब्स’ कंपनीच्या स्टॉकने 1336 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. तर 12 मे 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 801.40 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.
गुंतवणूकीचा वाटा :
डिसेंबर 2022 मधील तिमाहीच्या आकडेवारी नुसार ‘एपीएल अपोलो ट्यूब्स’ कंपनीच्या सार्वजनिक शेअर धारकांनी कंपनीचे 68.85 टक्के म्हणजेच 19.09 कोटी शेअर्स धारण केले होते. तर कंपनीच्या पाच प्रवर्तकांनी 31.15 टक्के म्हणजेच 8.63 कोटी शेअर्स धारण केले होते. कंपनीच्या तिमाही निकालांचे निरीक्षण केल्यास आपल्याला समजेल की, डिसेंबर 2022 तिमाहीत कंपनीने 169.18 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मागील तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफा 127.88 कोटी रुपये होता. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 3,230 कोटी रुपयांच्या तुलनेत तिसऱ्या तिमाहीत कंपनीच्या सेल्स मध्ये वाढ झाली आणि कंपनीने 4,327 कोटी रुपये विक्री केली. डिसेंबर 2022 तिमाहीत कंपनीचा EBITDA 202.28 कोटी वरून 35 टक्के वाढून 272.85 कोटी रुपयेवर पोहचला होता.
‘एपीएल अपोलो ट्यूब्स’ कंपनीच्या स्टॉकबाबत अनेक ब्रोकरेज फर्म उत्साही पाहायला मिळत आहेत. Tips2trade फर्मच्या तज्ञांनी ‘एपीएल अपोलो ट्यूब्स’ कंपनीचे शेअर्स पुढील काळात 1338-1395 रुपयांपर्यंत जाऊ शकतात असा अंदाज व्यक्त केला आहे. त्याच वेळी ICICI सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी स्टॉक खरेदी करण्याची शिफारस केली आहे. यासाठी त्यांनी लक्ष्य किंमत 1375 रुपये निश्चित केली आहे. याशिवाय अॅक्सिस सिक्युरिटीज फर्म देखील या स्टॉकसाठी 1,390-1,440 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली असून स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | APL Apollo Tubes Share Price on 28 March 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं