Asarfi Hospital Share Price | लॉटरी लागली! असर्फी हॉस्पिटल शेअरने फक्त 1 दिवसात 100 टक्के परतावा दिला, हा शेअर खरेदी करणार का?

Asarfi Hospital Share Price | असर्फी हॉस्पिटल कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जबरदस्त वाढीसह सूचीबद्ध झाले आहेत. असर्फी हॉस्पिटल कंपनीचे शेअर्स बुधवारी दिनांक 26 जुलै 2023 रोजी 100 टक्के प्रीमियम वाढीसह BSE SME एक्सचेंजवर सूचीबद्ध करण्यात आले होते. या कंपनीचे शेअर्स तब्बल 100 टक्के प्रीमियम वाढीसह 98.80 रुपये प्रति शेअर किमतीवर सूचीबद्ध झाले आहे. (Asarfi Share Price)
आज देखील या कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत आहे. शेअरची लिस्टिंग काही वेळात किंमत 103.74 रुपये या उच्चाक किमतीवर पोहचली होती. आज गुरूवार दिनांक 27 जुलै 2023 रोजी असर्फी हॉस्पिटल कंपनीचे शेअर्स 0.25 टक्के वाढीसह 104 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
असर्फी हॉस्पिटल कंपनीच्या IPO मध्ये शेअरची इश्यू किंमत 52 रुपये निश्चित करण्यात आली होती. ज्या लोकांनी या कंपनीच्या शेअरमध्ये पैसे लावले होते, त्यांना लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी दुप्पट परतावा मिळाला आहे. 17 जुलै 2023 रोजी असर्फी हॉस्पिटल कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता.
बुधवार दिनांक 19 जुलै 2023 पर्यंत हा IPO गुंतवणुकीसाठी खुला होता. असर्फी हॉस्पिटल कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 51 रुपये ते 52 रुपये प्रति इक्विटी शेअर जाहीर केली होती. असर्फी हॉस्पिटल IPO मध्ये 26.94 कोटी रुपये मूल्याचे 51.80 लाख इक्विटी शेअर्स खुल्या बाजारात विकले आहेत.
हेम सिक्युरिटीज लिमिटेड यांना असर्फी हॉस्पिटल कंपनीच्या पब्लिक इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून नियुक्त करण्यात आले होते. तर कॅमिओ कॉर्पोरेट सर्व्हिसेस यांना IPO रजिस्ट्रार म्हणून नियुक्त करण्यात आले होते. किरकोळ गुंतवणूकदारांना IPO मध्ये गुंतवणूक करण्यासाठी किमान 104,000 रुपये जमा करावे लागले होते. तर एका लॉटमध्ये कंपनीने 2,000 शेअर्स ठेवले होते.
असर्फी हॉस्पिटल ही कंपनीची उपस्थिती झारखंडमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. ही कंपनी आपल्या IPO मधून जमा केलेले पैसे झारखंडच्या रंगुनी येथील कॅन्सर हॉस्पिटलच्या निर्मितीसाठी खर्च करणार आहे. तसेच सामान्य व्यावसायिक वापरासाठी कंपनी झारखंडची राजधानी रांची येथे भाडेतत्त्वावर जमीन संपादित करणार आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Asarfi Hospital Share Price today on 27 July 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं