Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 75 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY

Ashok Leyland Share Price | गुरुवार, 26 डिसेंबर 2024 रोजी संमिश्र ग्लोबल संकेतांमुळे स्टॉक मार्केटमध्ये विशेष ट्रेडिंग दिसून आली आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग वेळी बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक रेंजमध्ये राहिले होते. गुरुवारी स्टॉक मार्केट एनएसई निफ्टी 23750 च्या पातळीवर बंद झाला होता. तर बीएसई सेन्सेक्समध्ये केवळ 1 अंकांची किरकोळ घसरण झाली होती.
Oberoi Realty Share Price – NSE: OBEROIRLTY
एलारा कॅपिटल ब्रोकरेज फर्मने ओबेरॉय रियल्टी लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. एलारा कॅपिटल ब्रोकरेज फर्मने ओबेरॉय रियल्टी कंपनी शेअरसाठी २३५० रुपये टार्गेट प्राईससह ‘BUY’ कॉल दिला आहे. आर्थिक वर्ष 2024-26 दरम्यान ओबेरॉय रियल्टी कंपनीच्या प्री-सेल्स’मध्ये 59 टक्के वाढ अपेक्षित आहे. आर्थिक वर्ष 2024 आणि 2025 च्या पहिल्या सहामाहीत ओबेरॉय रियल्टी कंपनीच्या निवासी प्रकल्पांचे मार्जिन अनुक्रमे 48% आणि 56% होते.
नोमुरा ब्रोकरेज फर्मने देखील ओबेरॉय रियल्टी कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. नोमुरा ब्रोकरेजने ओबेरॉय रियल्टी कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंगसह २५०० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. नोमुरा ब्रोकरेजने पुढे सांगितले की, ‘आर्थिक वर्ष २०२७ पर्यंत ३००० ते ४००० कोटी रुपयांचा ऑपरेटिंग कॅश फ्लो सुरू होण्याचा अंदाज आहे.
Mahindra Logistics Share Price – NSE: MAHLOG
व्हेंचुरा सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. व्हेंचुरा सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने महिंद्रा लॉजिस्टिक्स कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंगसह ६४६ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. म्हणजे महिंद्रा लॉजिस्टिक्स शेअर गुंतवणूकदारांना सध्याच्या पातळीपेक्षा जवळपास 75 टक्के परतावा मिळू शकतो. सध्या महिंद्रा लॉजिस्टिक्स शेअर 379 रुपयांवर ट्रेड करतोय. महिंद्रा लॉजिस्टिक्स शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 554.70 रुपये होता आणि नीचांकी स्तर 366.55 रुपये होता.
Ashok Leyland Share Price – NSE: ASHOKLEY
आयसीआयसीआय सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने अशोक लेलँड लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने अशोक लेलँड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग सह २९५ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मच्या मते अशोक लेलँड शेअर गुंतवणूकदारांना सध्याच्या पातळीवरून ३५ टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतो. सध्या हा शेअर 220.04 रुपयांवर ट्रेड करतोय.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Ashok Leyland Share Price Thursday 26 December 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं