Axis Bank Share Price | ॲक्सिस बँकेचे शेअर्स अल्पावधीत FD पेक्षा चौपट परतावा देतील, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर केली

Axis Bank Share Price | मागील अनेक दिवसा भारतीय शेअर बाजारात ब्लडबाथ पाहायला मिळत आहे. विक्रीच्या दबावामुळे भारतीय शेअर बाजारातील दिग्गज कंपन्यांचे शेअर्स लाल निशाणीवर ट्रेड करत आहेत, 26 ऑक्टोबर 2023 रोजी सेन्सेक्समध्ये 901 अंकाची घसरण पाहायला मिळाली होती. अशा मंदीच्या काळात देखील अॅक्सिस बँकेचे शेअर्स मजबुतीने ट्रेड करत आहेत.
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अॅक्सिस बँकेचे शेअर 1.89 टक्क्यांच्या वाढीसह 973.55 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. नुकताच ॲक्सिस बँकेने आपले तिमाही निकाल जाहीर केले आहेत. त्यामुळे बँकेच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. आज शुक्रवार दिनांक 27 ऑक्टोबर 2023 रोजी ॲक्सिस बँकेचे शेअर्स 2.87 टक्के वाढीसह 999.90 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
अॅक्सिस बँकेने सप्टेंबर 2023 च्या तिमाहीत वार्षिक 10 टक्के वाढीसह 5,864 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत ॲक्सिस बँकेने 5,329 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. 2023-24 या चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत ॲक्सिस बँकेने 31,660 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.
मागील वर्षी याच तिमाहीत बँकेने 24,094 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवालने अॅक्सिस बँकेच्या शेअर्सवर बाय रेटिंग देऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी तज्ञांनी 1150 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. ही लक्ष किंमत शेअर्सच्या सध्याच्या किंमतीपेक्षा 20 टक्के अधिक आहे.
ब्रोकरेज हाऊस येस सिक्युरिटीजने देखील अॅक्सिस बँकेच्या शेअर्सवर बाय रेटिंग देऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मने या स्टॉकवर 1350 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. ही लक्ष किंमत सध्याच्या किमतीपेक्षा 40 टक्के जास्त आहे.
ब्रोकरेज हाऊस फिलिप कॅपिटलनेही गुंतवणूकदारांना अॅक्सिस बँकेचे शेअर्स खरेदी यासह ब्रोकरेज हाऊस आयसीआयसीआय सिक्युरिटीजने देखील अॅक्सिस बँकेच्या शेअर्सवी बाय रेटिंग देऊन स्टॉक 1150 रुपये लक्ष किमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ही लक्ष किंमत ॲक्सिस बँकेच्या सध्याच्या किमतीपेक्षा 19 टक्के अधिक आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Axis Bank Share Price NSE 27 October 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं