Penny Stock | होय! मार्ग श्रीमंतीचा, फक्त 4 दिवसात या शेअरने 60% परतावा दिला, आता खरेदी करावा का हा स्टॉक?

Penny Stock | बाळकृष्ण पेपर मिल्स या पेपर आणि पेपर उत्पादने बनवणाऱ्या उद्योगाशी संबंधित कंपनीच्या शेअर्समध्ये प्रचंड मोठी उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील 4 दिवसात बाळकृष्ण पेपर मिल कंपनीच्या शेअर्समध्ये 60 टक्केपेक्षा अधिक वाढ पाहायला मिळाली आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या वाढीसह 50.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज हा स्टॉक 9.94 टक्क्यांच्या घसरणीवर 40.30 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. आज शेअर बाजार कोसळला आणि त्यात हा स्टॉक देखील विक्रीचा बळी ठरला.
बाळकृष्ण पेपर मिल्स स्टॉक
बाळकृष्ण पेपर मिल्स कंपनीने स्टॉक एक्स्चेंज नियामक सेबीला माहिती दिली आहे की, शेअर्सच्या व्हॉल्यूम आणि किंमतीतील वाढीबद्दल कंपनी कडे कोणतीही माहिती उपलब्ध नाही. कंपनीने असे कोणतेही काम केले नाही जे शेअर्सच्या किंमतीवर आणि व्हॉल्यूमवर परिणाम करू शकतात. मागील 2 ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअर्समध्ये 20-20 टक्क्यांचे दोन अप्पर सर्किट लागले होते. दुसरीकडे बालकृष्ण पेपर मिल्स कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 8 टक्के वाढले होते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 58.45 रुपये होती. त्याच वेळी बाळकृष्ण पेपर मिल्स कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत 25.05 रुपये होती. स्टॉक मध्ये आज लोअर सर्किट लागला होता, आणि काल स्टॉक मध्ये जी तेजी आली होती, आज ती नाहीशी झाली होती.
बाळकृष्ण पेपर मिल्स कंपनीच्या शेअर्समध्ये बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 44.73 ते 46.20 रुपये दरम्यान 4 मोठे बल्क डील झाले. हे सौदे 44.73 रुपये ते 46.20 रुपयांच्या दरम्यान पूर्ण झाले आहेत. बालकृष्ण पेपर मिल्स कंपनी सियाराम पोद्दार उद्योग समूहाचा भाग आहे. या उद्योग समूहाचा व्यवसाय कापड, गारमेंट यार्न, होम फर्निशिंग आणि पेपर इत्यादी सेक्टरमध्ये विस्तारलेला आहे. ही कंपनी कोटेड डुप्लेक्स बोर्डची निर्मिती करते, जे विविध उद्योगांमध्ये पॅकेजिंग कामात वापरतात. मागील एका वर्षात बालकृष्ण पेपर मिल्स कंपनीच्या शेअरमध्ये 82 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. कंपनीचे बाजार भांडवल 52 कोटी रुपये असून कंपनीच्या भंग भांडवलात प्रवर्तकांचा वाटा 58.70 टक्के आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Balkrishna Papar Mills Share price has fallen down today check details on 23 December 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं