Bank FD Interest Rate | जबरदस्त! प्रसिद्ध बँकेच्या खास FD वर मिळतंय 8.15 टक्के व्याज, डिपॉझिटर्सचा तुफान प्रतिसाद

Bank FD Interest Rate | जन स्मॉल फायनान्स बँकेने दोन कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवरील (FD) व्याजदरात बदल केला आहे. जन स्मॉल फायनान्स बँक सामान्य ग्राहकांना ५०० दिवसांच्या एफडीवर ८.१५ टक्के व्याज देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना 500 दिवसांच्या मुदत ठेवीवर 8.85 टक्के व्याज दिले जात आहे. जन स्मॉल फायनान्स बँकेच्या मुदत ठेवींचे नवे दर 10 एप्रिल 2023 पासून लागू होणार आहेत.
जन स्मॉल फायनान्स बँकेचे मुदत ठेवीचे दर
जन स्मॉल फायनान्स बँक ७ दिवस ते १४ दिवसांच्या मुदत ठेवींवर सामान्य ग्राहकांना ३.७५ टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना ४.४५ टक्के व्याज देत आहे. तर 15 दिवस ते 60 दिवसांच्या मुदत ठेवींवर बँक सामान्य ग्राहकांना 4.25 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 4.95 टक्के व्याज देत आहे. ६१ दिवस ते ९० दिवसांच्या मुदत ठेवींवर बँक सामान्य ग्राहकांना ५ टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना ५.७० टक्के व्याज देत आहे. तर जन स्मॉल फायनान्स बँक सामान्य ग्राहकांना ६.२५ टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना ९१ दिवस ते १८० दिवसांच्या मुदत ठेवींवर ६.९५ टक्के व्याज देत आहे.
सर्व ग्राहकांना २ वर्षे ते ३ वर्षांच्या एफडीवर किती टक्के व्याज?
जन स्मॉल फायनान्स बँक १८१ दिवसते ३६४ दिवसांच्या मुदत ठेवींवर सामान्य ग्राहकांना ७ टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना ७.७० टक्के व्याज देत आहे. तर 365 दिवस ते 2 वर्षांच्या मुदत ठेवींवर बँक सामान्य ग्राहकांना 7.25 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.95 टक्के व्याज देत आहे. जन स्मॉल फायनान्स बँक 2 वर्षते 3 वर्षांपर्यंतच्या एफडीवर 7.35% स्टँडर्ड रेट देत आहे.
तर ज्येष्ठ नागरिकांना याच कालावधीच्या मुदत ठेवींवर ८.०५ टक्के व्याज मिळत आहे. 3 वर्षे ते 5 वर्षांच्या मुदत ठेवींवर बँक सामान्य ग्राहकांना 7.25 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.95 टक्के व्याज देत आहे. तर जन स्मॉल फायनान्स बँक सामान्य ग्राहकांना 6 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 5 वर्षे ते 10 वर्षांच्या मुदत ठेवींवर 6.70 टक्के व्याज देत आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Bank FD Interest Rate up to 8.15 percent for 500 days check details on 13 April 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं