Bank of Baroda Investment | सरकारी बँकेतील भरवशाची गुंतवणूक, फक्त 170 रुपयांपासून गुंतवणूक करा, 32% पर्यंत परतावा मिळेल

Bank of Baroda Share Price | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात पैसे लावून कमाई करु इच्छित असाल तर तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. नुकताच संपलेल्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर होणार आहे. काही निवडक क्षेत्रांचे स्टॉक तज्ज्ञांच्या फोकसमध्ये आले आहेत. यामध्ये बँकिंग स्टॉकचाही समावेश आहे. ‘मॉर्गन स्टॅनले’ आणि ‘सिटी’ यांनी ‘बँक ऑफ बडोदा’ चे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मच्या अहवालानुसार पुढील काही दिवसांत ‘बँक ऑफ बडोदा’ स्टॉक 32 टक्के वाढू शकतो. आज बुधवार दिनांक 12 एप्रिल 2023 रोजी हा स्टॉक 0.26 टक्के घसरणीसह 170.40 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. (Bank of Baroda Limited)
ब्रोकरेज फर्मचा सल्ला :
मॉर्गन स्टॅनली फर्मने ‘बँक ऑफ बडोदा’ चे ओव्हरवेट रेटिंग कायम ठेवले असून त्यावर तज्ञांनी 220 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. त्याच वेळी, ‘सिटी’ फर्मने हा PSU बँकिंग स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. सिटी ने या स्टॉकवर 210 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे. 10 एप्रिल 2023 रोजी हा स्टॉक 166 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. पुढील काळात हा स्टॉक गुंतवणूकदारांना 30 टक्क्यांपेक्षा जास्त नफा मिळवून देऊ शकतो.
बँक ऑफ बडोदाच्या शेअरची स्थिती :
शेअर बाजारात मागील काही आठवड्यापासून तेजी पाहायला मिळत आहे. याचा परिणाम सरकारी बँकिंग स्टॉकवरही पाहायला मिळत आहे. ‘बँक ऑफ बडोदा’ चे शेअर्स मागील 6 महिन्यांच्या कालावधीत 28 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. मागील 1 वर्षाच्या कालावधीत हा बँकिंग स्टॉक 38 टक्के वाढला आहे 2023 या वर्षात हा बँकिंग स्टॉक 10 टक्क्यांनी कमजोर झाला आहे.
बँक ऑफ बडोदा स्टॉक ट्रिगर :
नुकताच संपलेल्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत, या सरकारी बँकांच्या एकूण ठेवी वार्षिक आधारावर 15.1 टक्के वाढीसह 12 लाख कोटी रुपयेवर पोहोचल्या आहेत. देशांतर्गत कर्जातही 16.9 टक्क्यांची जबरदस्त वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे जागतिक कर्जामध्ये 19 टक्के आणि बँकेच्या किरकोळ कर्जामध्ये 26.9 टक्के झाली आहे. याशिवाय, बँक ऑफ बडोदाने 1 वर्षाचा MCRL 8.55 टक्के वरून वाढवून 8.60 टक्के केला आहे. हे नवीन दर आजपासून म्हणजेच 12 एप्रिल 2023 पासून लागू झाले आहेत.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Bank of Baroda Share Price on 12 April 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं