Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्र गुंतवणूकदार मालामाल होणार, शॉर्ट टर्म मध्ये मोठी कमाई होणार

Bank of Maharashtra | चालू आर्थिक वर्ष 2024-25 च्या पहिल्या तिमाहीत बँक ऑफ महाराष्ट्रच्या निव्वळ नफ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2025 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 46.64 टक्क्यांनी वाढून 1,293 कोटी रुपये झाला आहे, जो आर्थिक वर्ष 2024 च्या पहिल्या तिमाहीत 882 कोटी रुपये होता.
आर्थिक वर्ष 2025 च्या पहिल्या तिमाहीत ऑपरेटिंग नफा 2,294 कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो आर्थिक वर्ष 2024 च्या पहिल्या तिमाहीत 1,863 कोटी रुपये होता.
निव्वळ व्याज उत्पन्न (एनआयआय) आर्थिक वर्ष 2025 च्या पहिल्या तिमाहीत 19.63 टक्क्यांनी वाढून 2,799 कोटी रुपयांवर पोहोचले आहे, जे आर्थिक वर्ष 2024 च्या पहिल्या तिमाहीत 2,340 कोटी रुपये होते. आर्थिक वर्ष 2025 च्या पहिल्या तिमाहीत शुल्क आधारित उत्पन्न वार्षिक आधारावर 12.15 टक्क्यांनी वाढून ३६८ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. आर्थिक वर्ष 2025 च्या पहिल्या तिमाहीत बिगर व्याज उत्पन्न 894 कोटी रुपयांवर पोहोचले आहे, जे आर्थिक वर्ष 2024 च्या पहिल्या तिमाहीत 629 कोटी रुपये होते.
सकल एनपीए (अनुत्पादक मालमत्ता) 30 जून 2024 पर्यंत सुधारून 1.85 टक्क्यांवर पोहोचला आहे, जो मागील वर्षी याच तिमाहीत 2.28 टक्के आणि मागील तिमाहीत 1.88 टक्के होता.
आर्थिक वर्ष 2025 च्या पहिल्या तिमाहीत कॉस्ट टू इनकम रेशो 37.87 टक्के होता, जो आर्थिक वर्ष 2024 च्या पहिल्या तिमाहीत 37.23 टक्के होता. आर्थिक वर्ष 2025 च्या पहिल्या तिमाहीत मालमत्तेवरील परतावा (आरओए) 1.72 टक्क्यांवर पोहोचला आहे, जो आर्थिक वर्ष 2024 च्या पहिल्या तिमाहीत 1.33 टक्के होता. रिटर्न ऑन इक्विटी (ROE) आर्थिक वर्ष 2025 च्या पहिल्या तिमाहीत 27.62 टक्क्यांवर पोहोचला आहे, जो आर्थिक वर्ष 2024 च्या पहिल्या तिमाहीत २३.७३ टक्के होता.
तज्ज्ञांना विश्वास – बँक ऑफ महाराष्ट्र शेअर मोठा परतावा देणार
शेअर बाजारात सध्या तेजी असून केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 सादर होण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना इन्फ्रा, एफएमसीजी आदी विविध क्षेत्रांशी संबंधित कंपन्यांच्या शेअर्सच्या किमतीत तेजी दिसून येणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 23 जुलै रोजी लोकसभेत 2024 चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
100 रुपयांपेक्षा कमी किमतीचा, पण वाढण्याची क्षमता असलेला शेअर पाहूया. या शेअरमध्ये गुंतवणूक करून तुम्ही चांगला नफा कमावू शकता. शेअर बाजार तज्ज्ञ अविनाश गोरक्षकर आणि आस्था जैन यांनी या शेअरसाठी गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे..
बँक ऑफ महाराष्ट्र शेअर खरेदीचा सल्ला – 90 रुपयावर पोहोचणार
अविनाश गोरक्षकर आणि आस्था जैन या दोघांनाही सरकारी बँक ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ शेअरवर ‘बाय’ रेटिंग दिली आहे. अविनाशने 6 ते 12 महिन्यांच्या कालावधीसाठी सुमारे 90 रुपये, तर जैन यांनी 2 ते 3 महिन्यांत 85 रुपयांचे उद्दिष्ट गाठेल असं म्हटलं आहे. गुंतवणूक तज्ज्ञ गोरक्षकर म्हणाले की, गेल्या तीन वर्षांत बँकेने चांगली कामगिरी केली आहे. सध्या हा शेअर 67 रुपयांवर ट्रेड करतोय.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title : Bank of Maharashtra Share Price NSE Live 17 July 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं