Bank Shares | अमेरिकेतील बँकिंग संकट भारतासाठी सुवर्ण संधी? तज्ञ म्हणतात बँकिंग स्टॉक खरेदी करा, स्टॉकचे नाव, टार्गेट प्राईस पहा

Bank Shares | जगात आर्थिक महासत्ता म्हणून मिरवणाऱ्या अमेरिकेला जबरदस्त दणका बसला आहे. अमेरिकेतील दोन प्रतिष्ठित बँका बुडाल्या आहेत. आणि 14 इतर अमेरिकन बँका बुडण्याच्या जवळ आहेत. अशा सर्व नकारात्मक बातम्यांचा परिणाम भारतीय बँकांच्या शेअर्सवर ही पाहायला मिळत आहे. ‘युनियन बँक’, ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’, ‘बँक ऑफ बडोदा’, ‘कॅनरा बँक’, ‘आयसीआयसीआय बँक’, ‘आरबीएल बँक’, ‘इंडसइंड बँक’, ‘अॅक्सिस बँक’, यांचे शेअर्स जबरदस्त विक्रीच्या दबावाखाली आले आहे. अशा वेळी बऱ्याच तज्ञांनी या संकटाकडे संधी म्हणून पाहायला सुरुवात केली आहे. पुढील काळात भारतीय बँकिंग सेक्टर मजबूत वाढेल असे तज्ञांना वाटते.
शेअर बाजारातील 59 पैकी 58 दिग्गज तज्ञांनी अॅक्सिस बँकेचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. यावर त्यांनी 1,098.02 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. तर प्रभुदास लिल्लीधर फर्मने 800 च्या लक्ष्य किंमतीसह ‘ॲक्सिस बँक’ स्टॉक विकण्याचा सल्ला दिला आहे. मोतीलाल ओसवाल फर्म च्या तज्ञांनी ॲक्सिस बँकवर 1,130 रुपये लक्ष्य किंमत दिली आहे. आज बुधवार दिनांक 15 मार्च 2023 रोजी ॲक्सिस बँकेचे शेअर्स 1.19 टक्के घसरणीसह 822.90 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. ‘युनियन बँक’ च्या स्टॉकबाबत 18 दिग्गज तज्ञ उत्साही पाहायला मिळत आहेत. तज्ञांनी या बँकेचे शेअर्स 92.17 रुपये लक्ष्य किंमतीसाठी स्टॉक खरेदीची शिफारस केली आहे. ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने या स्टॉकवर 100 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे.
शेअर बाजारातील 22 पैकी 20 दिग्गज तज्ज्ञ कॅनरा बँकेच्या स्टॉकवर उत्साही पाहायला मिळत आहे. तर दोन तज्ञांनी हा स्टॉक विकण्याचा सल्ला दिला आहे. मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसने या बँकेच्या शेअरसाठी 349.73 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. पुढील काही दिवसांत ICIC बँकेचे शेअर्स 1150 रुपयांवर जातील, असे तज्ञ म्हणतात. 43 पैकी 41 तज्ञांनी या बँकेच्या स्टॉकवर 1111.88 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी या स्टॉकची लक्ष्य किंमत 1,150 रुपये निश्चित केली आहे.
आरबीएल बँकेचे शेअर्स पुढील काळात 37 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतात, असे मत मोतीलाल ओसवाल फर्मने व्यक्त केले आहे. मोतीलाल ओसवाल यांनी या बँकेचे शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आणि त्यासाठी त्यांनी 200 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. तर 19 पैकी 18 तज्ञांनी RBL बँकेच्या स्टॉकवर 179.84 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. शेअर बाजारातील 41 दिग्गज तज्ञांनी स्टेट बँक ऑफ इंडिया स्टॉकसाठी 705.69 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. मोतीलाल ओसवाल फर्मच्या तज्ञांनी SBI स्टॉकसाठी 725 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. तर इंडसाइड बँकेच्या स्टॉकवर तज्ञांनी 1,450 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Bank Shares return on investment in banking stocks check details on 15 March 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं