Banking Alert | अनेकदा बँकेत जाऊन व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाचा अलर्ट, नव्या अपडेट्सने तुमची मोठी गैरसोय होऊ शकते

Banking Alert | बँकिंग क्षेत्रातील सध्याच्या घडामोडीनंतर जर सर्व काही सुरळीत राहिले तर बँकांना दर आठवड्याला दोन दिवस सुट्टी मिळेल. किंबहुना बँकांमध्ये दोन दिवसांच्या साप्ताहिक सुट्टीबाबत अनेक दिवसांपासून विचारमंथन सुरू आहे. त्यावर २८ जुलै रोजी निर्णय होऊ शकतो. इंडियन बँकिंग असोसिएशन (आयबीए) पुढील आठवड्यात शुक्रवारी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (यूएफबीयू) सोबत होणाऱ्या बैठकीत हा निर्णय घेऊ शकते.
युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या म्हणण्यानुसार, गेल्या चर्चेत 5 दिवसांच्या बँकिंग कामाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. इंडियन बँकिंग असोसिएशनने सांगितले की, हा मुद्दा विचाराधीन आहे आणि त्यावर काम केले जात आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या म्हणण्यानुसार, याला गती देण्याची विनंती करण्यात आली आहे जेणेकरून विनाविलंब आठवड्यातून पाच बँकिंग दिवस सुरू करता येतील.
मात्र, बँक कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामाच्या वेळेत ४० मिनिटांची वाढ होऊ शकते. २८ जुलै रोजी बैठक होणार आहे. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यासाठी अर्थ मंत्रालय आणि रिझर्व्ह बँकेची मंजुरीही आवश्यक आहे.
आता काय आहे नियम :
सध्या महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी बँका सुरू असतात, मात्र आता बँकांचे कामकाजाचे दिवस आठवड्यातून केवळ पाच दिवस असावेत, तसेच कर्मचाऱ्यांना दोन दिवस साप्ताहिक सुट्टी देण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळात (एलआयसी) पाच कार्यदिवसांचा नियम लागू करण्यात आला आहे.
ऑगस्टमध्ये किती सुट्ट्या :
यावर्षी ऑगस्टमध्ये देशाच्या विविध भागात एकूण 14 दिवस बँका बंद राहणार आहेत. मात्र, सुट्ट्या असूनही ऑनलाइन बँकिंग सेवा आणि एटीएम सेवेत कोणतीही अडचण येणार नाही. १४ दिवसांच्या सुट्टीत महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारव्यतिरिक्त रविवारचा समावेश आहे.
Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title : Banking Alert banks may remain open only 5 days a week check details on 22 July 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं