BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL

BEL Share Price | गुरुवार 14 ऑक्टोबर रोजी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी शेअर 0.11 टक्के घसरून 281.25 रुपयांवर (NSE: BEL) पोहोचला होता. गुरुवारी हा शेअर 282 रुपयांवर खुला झाला होता, त्यानंतर दिवसभरात 284.45 रुपयांचा उच्चांक गाठला होता, तर 275.50 रुपये ही निच्चांकी पातळी होती. या कंपनीचे एकूण मार्केट कॅप 2,05,514 कोटी रुपये आहे. (बेल कंपनी अंश)
एचडीएफसी सिक्युरिटीज फर्म – ‘BUY’ रेटिंग
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी शेअरबाबत तज्ज्ञ उत्साही आहेत. एचडीएफसी सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. एचडीएफसी सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने BEL कंपनी शेअरसाठी ३४० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्सच्या शेअरची सध्याची किंमत २९७ रुपये आहे.
कंपनी दुसऱ्या तिमाहीचे निकाल
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीने दुसऱ्या तिमाहीत 4762.66 कोटी रुपयांचे एकत्रित एकूण उत्पन्न नोंदवले आहे, जे मागील तिमाहीतील एकूण उत्पन्न 4447.15 कोटी रुपयांच्या तुलनेत 7.09 टक्क्यांनी अधिक आहे आणि मागील वर्षाच्या याच तिमाहीतील 4146.12 कोटी रुपयांच्या एकूण उत्पन्नापेक्षा 14.87 टक्क्याने अधिक आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीने दुसऱ्या तिमाहीत 1083.88 कोटी रुपयांचा करोत्तर निव्वळ नफा कमावला आहे.
एचडीएफसी सिक्युरिटीज फर्मने काय म्हटले
एचडीएफसी सिक्युरिटीज फर्मने कंपनी संदर्भात म्हटले आहे की, ‘बीईएल कंपनीची डिफेन्स क्षेत्रातील प्रभावी स्थिती आणि सशस्त्र दलांशी सहकार्य, स्थापित पायाभूत सुविधा आणि उत्पादन सुविधा तसेच रिसर्च आणि डेव्हलमेंट क्षमतांमुळे प्रतिस्पर्ध्यांपेक्षा खूप भक्कम आहे. बीईएल कंपनीची ऑर्डरबुक मजबूत असून येत्या काळात कंपनीला अजून कॉन्ट्रॅक्ट मिळत राहतील असा अंदाज ब्रोकरेजने व्यक्त केला आहे.
शेअरने मल्टिबॅगर परतावा दिला
मागील ६ महिन्यात या शेअरने 21.78% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 96.61% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 658.50% परतावा दिला आहे. मात्र लॉन्ग टर्म गुंतवणूकदारांना या शेअरने 1,27,740% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर या शेअरने 52.07% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | BEL Share Price 14 November 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं