BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: BEL

BEL Share Price | सोमवारी स्टॉक मार्केटमध्ये जोरदार तेजी नोंदविण्यात आली होती. सोमवारी स्टॉक मार्केट निफ्टी 315 अंकांनी वधारून 24222 वर बंद (NSE: BEL) झाला होता. या तेजीत ब्रोकरेज कंपनीने भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. सोमवार 25 नोव्हेंबर रोजी हा शेअर 4.33 टक्के वाढून 293 रुपयांवर पोहोचला होता. (भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी अंश)
बीईएल कंपनी ऑर्डरबुक
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी ही देशातील आघाडीची डिफेन्स कंपनी आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी रडार, क्षेपणास्त्र प्रणाली, इलेक्ट्रॉनिक्स वॉरफेअर, एव्हिओनिक्स, पाणबुडीविरोधी तंत्रज्ञान विकसित करते. सप्टेंबर 2024 च्या आधारे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीची ऑर्डरबुक 75,000 कोटी रुपयांच्या जवळपास आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप २.१ लाख कोटी रुपये आहे.
बीईएलचा वाढीचा दृष्टीकोन मजबूत आहे
सध्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचा संरक्षण क्षेत्रातील वाटा ३० ते ३५ टक्के आहे. या कंपनीचे योगदान येत्या काळात आणखी वाढणार आहे. विमाने, युद्धनौका, पाणबुड्या, ड्रोन आणि क्षेपणास्त्रे मध्ये स्वदेशीकरणावर केंद्र सरकार भर देत आहे, ज्यात या कंपनीचा मोठा वाटा आहे. याशिवाय कंपनीला निर्यातीच्या मोठ्या संधी आहेत.
बीईएल शेअर टार्गेट प्राईस
या सर्व बाबी लक्षात घेऊन तज्ज्ञांनी बीईएल शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला जातो. तज्ज्ञांनी या शेअरसाठी ३४५ रुपयांची टार्गेट प्राईस दिली आहे. जुलैमध्ये भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअरने ३४० रुपयांचा उच्चांक गाठला होता. त्यांनतर हा शेअर २७० रुपयांपर्यंत घसरला होता.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | BEL Share Price 25 November 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं