BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL

BEL Share Price | शुक्रवार 13 डिसेंबर 2024 रोजी स्टॉक मार्केटमध्ये मोठी घसरण झाली होती. सकाळच्या सत्रात सकाळी ११ वाजून ४० मिनिटांनी स्टॉक मार्केट सेन्सेक्स आणि निफ्टी अनुक्रमे ६७४ आणि १८६ अंकांनी घसरले होते. मात्र दुपारी स्टॉक मार्केट सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांमध्ये नेत्रदीपक तेजी दिसून आली आहे. स्टॉक मार्केट सेन्सेक्स आपल्या नीचांकी पातळीपेक्षा 2000 अंकांनी वाढून बंद झाला होता. शुक्रवारी स्टॉक मार्केट निफ्टी मजबूत झाला असून २४७५० चा टप्पा ओलांडला आहे. शुक्रवारी स्टॉक मार्केट सेन्सेक्समध्ये जवळपास 850 अंकांची तेजी पाहायला मिळाली होती. (भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनी अंश)
मजबूत कंपनी ऑर्डरबुक
चालू आर्थिक वर्षात भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीची एकूण ऑर्डरबुक ८८२८ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी म्हटले की भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीची वाढीची क्षमता आणि त्यांची स्थिरता पाहता दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी हा एक अत्यंत फायद्याचा शेअर आहे.
भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअर 500 रुपयांचा टप्पा गाठू शकतो
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचा शेअर पुढील १ ते ९ महिने ३५० ते ५०० रुपयांच्या टार्गेट प्राईसवर पोहोचू शकतो, असे स्टॉक मार्केट तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी २४० रुपयांच्या पातळीवर स्टॉपलॉस ठेवावा असा सल्ला देखील दिला आहे.
शेअर चार्टवर कोणते संकेत?
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी शेअरचा आरओई सध्या २४.४१ टक्क्यांच्या पातळीवर आहे. शेअर चार्टनुसार ही पातळी भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीची भक्कम आर्थिक स्थिती आणि त्यांची बाजारातील स्थिती दर्शवते. भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअरचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स सध्या डेली चार्टवर ६४ च्या वर ट्रेड करत आहे तर मासिक चार्ट ८२ च्या पातळीवर आहे, जो तेजीच्या ट्रेडचे संकेत देत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीची आर्थिक स्थिती
दुसऱ्या तिमाहीत भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचा निव्वळ नफा ३४ टक्क्यांनी वाढून १,०९१ कोटी रुपयांवर पोहोचला आहे, तर परिचालनातून मिळणारा महसूल १५ टक्क्यांनी वाढून ४,५८३ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक 340.50 रुपये तर ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर 159.40 रुपये आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | BEL Share Price Friday 13 December 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं