BEL Share Price | मार्ग श्रीमंतीचा! मल्टिबॅगर सरकारी शेअर बंपर तेजीत, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राइस

BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या संरक्षण क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 3 टक्के वाढीसह 170.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीला एक मोठी ऑर्डर मिळाली आहे.
भारतीय संरक्षण मंत्रालयाने भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीसोबत करार केला आहे. या करारां अंतर्गत इलेक्ट्रॉनिक फ्यूज खरेदी करण्याची ऑर्डर दिली आहे. या डीलचे एकूण मूल्य 5300 कोटी रुपये आहे. शुक्रवार दिनांक 15 डिसेंबर 2023 रोजी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 3.26 टक्के वाढीसह 169.35 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
भारतीय संरक्षण मंत्रालयाने भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी सोबत 5336 कोटी रुपये मूल्याचा करार केला आहे. या कराराची मुदत 10 वर्ष आहे. भारतीय संरक्षण मंत्रालय भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीकडून इलेक्ट्रॉनिक फ्यूज खरेदी करणार आहे.
इलेक्ट्रॉनिक फ्यूज हा मध्यम हेवी कॅलिबर आर्टिलरी गनचा अविभाज्य घटक आहे. हे इलेक्ट्रॉनिक फ्युज आर्टिलरी गनमध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जातात. संरक्षण साहित्याची आयात कमी करून दारूगोळ्याचा साठा वाढवणे हा या प्रकल्पाचा उद्देश असल्याची माहिती भारतीय संरक्षण मंत्रालयाने दिली आहे.
मागील एका वर्षात भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 70 टक्के परतावा कमावून दिला आहे. 16 डिसेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 99.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 15 डिसेंबर 2023 रोजी या सरकारी कंपनीचे शेअर्स 170.15 रुपये किमतीवर पोहोचले होते.
मागील 3 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांचे पैसे 320 टक्के वाढवले आहे. 18 डिसेंबर 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 40.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 87 रुपये होती. ब्रोकरेज फर्मने भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या शेअर्सवर 205 रुपये टारगेट प्राइस जाहीर केली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | BEL Share Price NSE 15 December 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं