BEL Share Price | मोठी ऑर्डर मिळाली! भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअर्समध्ये तेजी, या सकारात्मक बातमीमुळे खरेदी वाढवली

BEL Share Price| भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या संरक्षण क्षेत्रातील सरकारी मालकीच्या कंपनीचे शेअर्स मागील आठवड्यात शुक्रवारी 4 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये ही अचानक वाढ नवीन वर्क ऑर्डर प्राप्त झाल्याने पाहायला मिळत आहे.
रडार आणि जॅमरची ऑर्डर मिळाली
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीला रडार आणि जॅमरची ऑर्डर मिळाली आहे. ही बातमी येताच गुंतवणुकदारांनी स्टॉक खरेदीसाठी ऑर्डर टाकायला सुरुवात केली. शुक्रवारी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड स्टॉक 4.25 टक्क्यांच्या वाढीसह 125.85 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. तर आज सोमवार दिनांक 3 जुलै 2023 रोजी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.67 टक्के घसरणीसह 123.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
ऑर्डर तपशील
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत म्हंटले आहे की, कंपनीला मिळालेल्या नवीन संरक्षण आणि गैर-संरक्षण ऑर्डरचे मूल्य 2191 कोटी रुपये आहे. या ऑर्डरनुसार भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी वॉरहेड, जॅमर, रणांगण सर्वेक्षण रडार, क्षेपणास्त्र मार्गदर्शन रडार, रेडिओ रिले इत्यादीसह लांब पल्ल्याच्या मार्गदर्शन किटची पूर्तता करणार आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीला 8091 कोटी रुपये मूल्याचे ऑर्डर मिळाले होते.
शेअरची कामगिरी
मागील एका वर्षभरात भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 61.62 टक्के परतावा कमावून दिला आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअरची किंमत 2023 या वर्षात 23.32 टक्क्यांनी वर गेली आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 127.40 रुपये प्रति शेअर होती.
जानेवारी ते मार्च 2023 या कालावधीत भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीने 1366.38 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. वार्षिक आधारावर कंपनीच्या निव्वळ नफ्यात 19.18 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे.
मागील एका वर्षापूर्वी याच तिमाही कालावधीत भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीने 1146.50 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. तर FY23 मध्ये भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीने 2940.35 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. आर्थिक वर्ष 2022 च्या तुलनेत भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या नफ्यात 24.88 टक्क्यांची वाढ झाली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | BEL Share Price today on 03 July 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं