BEML Share Price | रेल्वे कंपनीचा शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने देणार परतावा, यापूर्वी दिला 305% परतावा - NSE: BEML

BEML Share Price | इंडिया अर्थ मूव्हर्स लिमिटेड कंपनीचा शेअर तेजीत आहे. बुधवारी इंडिया अर्थ मूव्हर्स लिमिटेड कंपनीचा (NSE: BEML) शेअर ४ टक्क्यांहून अधिक वधारून बंद झाला. गुरुवार 17 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.049 टक्के घसरून 3,870 रुपयांवर पोहोचला होता. (बीईएमएल कंपनी अंश)
कंपनीला मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळाला
इंडिया अर्थ मूव्हर्स लिमिटेड कंपनीला मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. हाय स्पीड ट्रेनचे डिझाइन, कमिशनिंग आणि मॅन्युफॅक्चरिंगसाठी इंडिया अर्थ मूव्हर्स लिमिटेड कंपनीला 867 कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. त्यांनतर कंपनीचे शेअर्स तेजीत आहेत. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही हायस्पीड गाड्यांमध्ये एकूण ८ डबे असतील अणि प्रत्येक डब्यासाठी २७ कोटी ८६ लाख रुपये खर्च येणार आहे. केंद्र सरकारच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीकडून हा कॉन्ट्रॅक्ट देण्यात आला आहे.
कॉन्ट्रॅक्ट बद्दल अधिक माहिती
इंडिया अर्थ मूव्हर्स लिमिटेड कंपनीच्या बेंगळुरू रेल्वे कोच कॉम्प्लेक्समध्ये या हायस्पीड ट्रेन तयार केल्या जातील. तसेच 2026 च्या अखेरीस वितरित केल्या जातील आणि या गाड्या पूर्णपणे वातानुकूलित असतील. तसेच खुर्च्यांमध्ये प्रवाशांना रिक्लिंग, रोटेटिंग सीट आणि ऑनबोर्ड इन्फोटेनमेंट सिस्टीम अशा सर्व आधुनिक सुविधा मिळतील अशी माहिती कंपनीने फायलिंगमध्ये दिली आहे.
या कॉन्ट्रॅक्टमुळे इंडिया अर्थ मूव्हर्स लिमिटेड कंपनीचे रेल्वे सेवा क्षेत्रातील स्थान अधिक बळकट झाले आहे. इंडिया अर्थ मूव्हर्स लिमिटेड कंपनीचे म्हणणे आहे की, हा कॉन्ट्रॅक्ट भारताच्या वेगाने वाढणाऱ्या रेल्वे नेटवर्कचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.
शेअरने दिलेला परतावा
२०२४ मध्ये आतापर्यंत इंडिया अर्थ मूव्हर्स लिमिटेड कंपनी शेअरने ३६% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात शेअरने ६०% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 305% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | BEML Share Price 17 October 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं