Bharat Electronics Share Price | या सरकारी मालकीच्या कंपनी शेअरने 44037% परतावा दिला, शेअर पुन्हा तेजीत आले, स्टॉक खरेदी करणार?

Bharat Electronics Share Price | ‘भारत इलेक्ट्रॉनिक्स’ कंपनीने भारतीय सशस्त्र दलांसाठी संरक्षण मंत्रालयासोबत 8,194 कोटी रुपये मूल्याच्या 12 करारांवर स्वाक्षरी केल्या आहेत. ही बातमी येताच शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये BEL कंपनीचे शेअर्स 7.5 टक्के वाढीसह 98.3 रुपये किमतीवर पोहोचले होते. भारतीय संरक्षण मंत्रालयाने 5,498 कोटी रुपयांचे एकूण 10 करार आणि सरकारी मालकीची एरोस्पेस आणि संरक्षण इलेक्ट्रॉनिक्स कंपनी ‘भारत इलेक्ट्रॉनिक्स’ सोबत 2,696 कोटी रुपये मूल्याचे दोन करार केल्याची माहिती जाहीर करण्यात आली आहे. कंपनीने स्टॉक एक्सचेंज नियामक सेबीला कळवले आहे की, अग्निशामक नियंत्रण प्रणाली, सॉफ्टवेअर परिभाषित रेडिओ, नौदलासाठी एचडी व्हीएलएफ एचएफ रिसीव्हर, शस्त्र शोध रडार, स्वयंचलित हवाई संरक्षण नियंत्रण आणि अहवाल प्रणाली, हवाई दलासाठी क्षेपणास्त्र प्रणाली, लष्करासाठी फायर डिटेक्शन, मध्यम – लिफ्ट हेलिकॉप्टरसाठी ईडब्ल्यू सूट, आकाशसाठी एएमसी उपकरणे, यांची पूर्ती करण्याचा करार करण्यात आला आहे. (Bharat Electronics Limited)
गुंतवणुकदारांना 44,037 टक्के परतावा
शुक्रवार दिनांक 31 मार्च 2023 रोजी BEL कंपनीचे शेअर्स 97.1 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका वर्षात BEL कंपनीचे शेअर्स 38 टक्के जास्त मजबूत झाले आहेत. BEL कंपनीने पूर्ण कार्यकाळात आपल्या गुंतवणुकदारांना 44,037 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 25 वर्षांत या कंपनीचे शेअर्स 22 पैसे किमतीवरून वाढून सध्याच्या किमतीवर पोहचले आहेत.
स्टॉक मार्केट तज्ञांचे मत :
ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने ‘भारत इलेक्ट्रॉनिक्स’ कंपनीच्या शेअरवर 125 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे. अनेक तज्ञांनी स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील काळात 29 टक्के पेक्षा जास्त वाढू शकतो. ICICI सिक्युरिटीज फर्म ने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, BEL कंपनी मजबूत ऑर्डर बुक, मजबूत ऑर्डर पाइपलाइन, आणि + 20 टक्के मार्जिनच्या सातत्यपूर्ण वितरणासह जबरदस्त कामगिरी करत आहे. याचा सर्व सकारात्मक बाबीचा फायदेशीर परिणाम शेअर्सच्या किमतीवर पाहायला मिळेल असे तज्ञ म्हणतात.
भारत इलेक्ट्रॉनिक्स या सरकारी मालकीच्या कंपनीने आपल्या पूर्ण कार्यकाळात एकूण 3 वेळा मोफत बोनस शेअर्सचे वाटप केले आहेत. BEL या नवरत्न दर्जा प्राप्त असलेल्या कंपनीने सप्टेंबर 2015 मध्ये 2 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते. तर सप्टेंबर 2017 मध्ये 1 : 10 या प्रमाणात मोफत बोनस शेअर वाटप केले होते. पुन्हा BEL कंपनीने आपल्या शेअर धारकांना सप्टेंबर 2022 मध्ये 2 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स जारी केले होते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Bharat Electronics Share Price on 01 April 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं