BHEL Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरमध्ये तेजीचे संकेत, मिळेल 45% परतावा, ब्रोकरेजने दिली BUY रेटिंग - NSE: BHEL

BHEL Share Price | भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीसमोर लार्सन अँड टुब्रो कंपनीने मोठं आव्हान उभं केलं (NSE: BHEL) आहे. औष्णिक ऊर्जा क्षेत्रात लार्सन अँड टुब्रो कंपनीने BHEL कंपनीसाठी मोठी स्पर्धा निर्माण केली आहे. एक मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यात लार्सन अँड टुब्रो कंपनी आघडीवर असल्याची माहिती जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्मने दिली आहे. सोमवार 21 ऑक्टोबर रोजी हा शेअर 2.64 टक्के घसरून 247.15 रुपयांवर पोहोचला होता. (भेल कंपनी अंश)
जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्मने काय म्हटले?
सप्टेंबर २०२४ तिमाहीत BHEL कंपनीला ८५ कोटी रुपयांचा निव्वळ तोटा होईल आणि ६८.७ कोटी रुपयांचा ऑपरेशनल तोटा होऊ शकतो, असा अंदाज जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्मने व्यक्त केला आहे. महसूल सिंगल डिजिटमध्ये वाढून ५,८७५.४ कोटी रुपयांवर जाऊ शकतो. तसेच BHEL कंपनीच्या ऑपरेटिंग लिव्हरेज आणि चांगल्या कॉन्ट्रॅक्टमुळे हेल्दी ऑर्डरबुक आणि EBITDA मुळे विक्रीत सुधारणा होऊ शकते, असे जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्मने म्हटले आहे.
कंपनी ऑर्डरबुक
BHEL कंपनीची ऑर्डरबुकमजबूत आहे. तसेच एकूण 8 गिगावॅट सक्रिय निविदा आणि 39 गिगावॅट प्रकल्प मंजुरीखाली आहेत. भविष्यात BHEL कंपनीसाठी मोठ्या कॉन्ट्रॅक्टची अपेक्षा आहे असं जेएम फायनान्शियलने म्हटले आहे. जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्मने या शेअरसाठी 361 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच BHEL कंपनी शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे.
कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज ब्रोकरेज फर्म – SELL रेटिंग
कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज ब्रोकरेज फर्मने BHEL शेअरसाठी ‘SELL’ रेटिंग दिली आहे. कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज ब्रोकरेज फर्मच्या मते या शेअरचे रास्त मूल्य १०० रुपये आहे आणि हा शेअर ६०% घसरू शकतो.
अँटिक स्टॉक ब्रोकिंग फर्म – BUY रेटिंग
अँटिक स्टॉक ब्रोकिंग फर्मने BHEL शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. अँटिक स्टॉक ब्रोकिंग फर्मने BHEL शेअरसाठी ३५२ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | BHEL Share Price 21 October 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं