Bonus Share News | संधी सोडू नका! फ्री शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटचा फायदा घ्या, शॉर्ट टर्म मध्ये पैसा वाढवा

Bonus Share News | स्टारलाइनप्स एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स मागील काही काळापासून फोकसमध्ये आले आहेत. मागील आठवड्यात पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत कंपनीने स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली होती. ही कंपनी आपल्या शेअरधारकांना 1 : 5 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. तसेच ही कंपनी आपले शेअर्स पाच तुकड्यात विभाजित देखील करणार आहे. ( स्टारलाइनप्स एंटरप्रायझेस कंपनी अंश )
या कंपनीने स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर्सची रेकॉर्ड डेट अद्याप जाहीर केलेली नाही. मागील आठवड्यात शुक्रवारी स्टारलाइनप्स एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स 162 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज सोमवार दिनांक 12 ऑगस्ट 2024 रोजी स्टारलाइनप्स एंटरप्रायझेस स्टॉक 0.092 टक्के घसरणीसह 162.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
स्टारलाइनप्स एंटरप्रायझेस कंपनीने स्टॉक एक्स्चेंजला माहिती दिली की, कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक गुरुवारी 8 ऑगस्ट 2024 रोजी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कंपनीच्या संचालकांनी इक्विटी शेअरधारकांना 1 : 5 या प्रमाणात मोफत बोनस इक्विटी शेअर्स वाटप करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली. आणि कंपनीचे शेअर्स 1 : 5 या प्रमाणात स्प्लिट करण्यास देखील मान्यता दिली आहे. कंपनी या संदर्भातील रेकॉर्ड डेट लवकरच जाहीर करेल, अशी माहिती कंपनीने दिली आहे.
मागील पाच वर्षांत स्टारलाइनप्स एंटरप्रायझेस कंपनीच्या शेअर्सची किंमत 26.80 रुपयेवरून वाढून 165 रुपये किमतीवर पोहचली होती. या काळात गुंतवणूकदारांनी तब्बल 500 टक्के परतावा कमावला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 182 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 83.30 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 700 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Bonus Share News on Starlineps Enterprises Share Price 12 August 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं