Bonus Shares | बंपर फायद्याचा शेअर! स्टार हाउसिंग फायनान्स फ्री बोनस शेअर्सने 1 लाख रुपयांचे झाले 21 लाख रुपये

Bonus Shares | शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या लोकांना विविध माध्यमातून फायदा मिळत असतात. काही कंपन्या आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स, डिव्हिडंड, बाय बँक, स्टॉक स्प्लिट या स्वरूपात फायदा देत असतात. सध्या स्टार हाउसिंग फायनान्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स अशाच कारणासाठी चर्चेत आले आहेत. स्टार हाउसिंग फायनान्स लिमिटेड कंपनीचा IPO फेब्रुवारी 2015 मध्ये 30 रुपये प्रति इक्विटी शेअर किमतीवर सूचीबद्ध झाला होता.
या कंपनीने आपल्या IPO च्या एका लॉटमध्ये 4,000 शेअर्स ठेवले होते. 20 मार्च 2023 रोजी स्टार हाउसिंग फायनान्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 32 रुपये प्रति शेअर किमतीवर सूचीबद्ध झाले होते. शुक्रवार दिनांक 27 ऑक्टोबर 2023 रोजी स्टार हाउसिंग फायनान्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 7.62 टक्के वाढीसह 65.13 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
स्टार हाउसिंग फायनान्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी 31.50 रुपये या इंट्राडे नीचांक किमतीवर ट्रेड करत होते. मागील आठ वर्षांत स्टार हाउसिंग फायनान्स लिमिटेड कंपनीने आपल्या शेअर धारकांना दोन वेळा बोनस इश्यू आणि एक वेळा स्टॉक स्प्लिटचा फायदा दिला होता.
स्टार हाउसिंग फायनान्स लिमिटेड कंपनीने आपल्या शेअर धारकांना 1 : 1 च्या प्रमाणात बोनस शेअर्स जाहीर केले होते. आणि 1 : 2 या प्रमाणात स्टॉक स्प्लिट देखील केले होते. स्टॉकची एक्स-स्प्लिट तारीख म्हणून 16 डिसेंबर 2022 हा दिवस निश्चित करण्यात आला होता.
स्टार हाऊसिंग फायनान्स कंपनीचा IPO फेब्रुवारी 2015 मध्ये शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. स्टार हाउसिंग फायनान्स लिमिटेड कंपनीने आपल्या IPO च्या एका लॉटमध्ये 4,000 शेअर्स ठेवले होते. या कंपनीचे शेअर्स 30 प्रति शेअर किमतीवर वाटप करण्यात आले होते. या IPO मध्ये एक लॉट खरेदी करणाऱ्या लोकांना किमान 1.20 लाख जमा करावे लागले होते.
2017 मध्ये स्टार हाउसिंग फायनान्स लिमिटेड कंपनीने आपल्या पात्र शेअर धारकांना 1 : 1 बोनस शेअर्स वाटप केले होते. बोनस शेअर्स वाटप केल्यावर गुंतवणूकदारांच्या शेअरची संख्या 8,000 झाली. डिसेंबर 2022 मध्ये स्टार हाउसिंग फायनान्स लिमिटेड कंपनीने पुन्हा 1 : 1 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप केले होते. त्यानंतर गुंतवणूकदारांच्या शेअर्सची संख्या 16,000 झाली.
16 डिसेंबर 2022 रोजी स्टार हाउसिंग फायनान्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1 : 2 या प्रमाणात विभाजित करण्यात आले होत. एक्स-स्प्लिटवर गुंतवणूकदारांच्या 16,000 शेअर्सचे विभाजन होऊन 32,000 शेअर्स झाले. म्हणजेच ज्या लोकांनी स्टार हाउसिंग फायनान्स लिमिटेड कंपनीच्या IPO मध्ये 1.20 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 21 लाख झाले आहेत. स्टार हाऊसिंग फायनान्स कंपनीचे शेअर्स 65.25 रुपये किमतीवर पोहचले आहेत. मागील.आठ वर्षांत या कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस लाभांशही वाटप केला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Bonus Shares benefits to shareholders on 28 October 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं