Bounced Cheque | चेक डिक्लाइन झाल्यास या गोष्टीवरून होऊ शकते तुमच्यावर कारवाई, माहिती असणं गरजेचं आहे

Bounced Cheque | आर्थिक व्यवहार करत असताना आपण अनेकदा समोरील व्यक्तीला काही काळाने पैसे द्यायचे असतील मात्र समोरच्या व्यक्तीला याची शाश्वती नसल्यास चेक देत असतो. चेक दिल्यावर ते अनेकदा रद्द केले जातात. ज्याची अनेक वेगवेगळी कारणे असतात. मात्र यात ब-याचदा बॅंक ज्या व्यक्तीच्या अकाऊंटमध्ये पैसे ट्रांसफर करायचे आहेत त्यास नकार देते. याला आपण डिसहॉनर चेक असे म्हणतात.
चेक डिसहॉनर होण्याची कारणे पुढील प्रमाणे
* ज्या व्यक्तीने चेक दिला आहे त्याच्या अकाऊमटमध्ये पैसे नसने.
* चेक देताना त्या व्यक्तीने चुकीची सही केली आहे.
* अनेकदा अकाऊंट नंबर जुळत नसल्याने देखील असे होते.
* तसेच चेक खराब झाला असेल अथवा त्यावर खाडाखोड असेल तेव्हा देखील तो नाकारला जातो.
* चेकची तारीख निघून जाणे.
* चेक देणारी किंवा स्वीकारणारी व्यक्ती या दोघांमनी त्यांचा निर्णय बदलणे.
* केव्हा होते कायदेशीर कारवाई
जेव्हा चेक डिसहॉनर होतो तेव्हा कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता असते. चेक डिसहॉनर होण्याची कारणे वेगवेगळी असली तरी देखील जर चेक देणा-या व्यक्तीने बॅंकेत तेवढी रक्कम न ठेवल्यास ही कारवाइ केली जाते. त्याला क्रिमिनल ऑफेन्स समजले जाते. तसेच नेगोशिएबल इंस्ट्रूमेंट्स ऍक्ट १८८१ अंतर्गत बॅंक त्या खातेदारकावर कारवाइ करते. यावर एक पर्याय देखील आहे. तो म्हणजे चेक देणा-या व्यक्तीने पुन्हा एकदा बॅंकेत योग्य रक्कम देउन चेक देणे. तसेही न केल्यास दोन वर्षांच्या शिक्षेसाठी त्या व्यक्तीने तयार रहावे.
या शिवाय चेक बाउंस होण्यासाठी अनेक कारणे आहेत. असे झाल्यावर संबंधीत खाते दारकावर कारवाई केली जाते. यात त्याच्याकडून दंड घेतला जातो. हा दंड प्रत्येक बॅंकेत वेगवेगळा असतो. तसेच तुमच्या चेकच्या रकमेवर देखील दंड आकारला जातो. त्यामुळे चेक देताना सर्व गोष्टींची खबरदारी घेऊन चेक दिला पाहिजे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Bounced Cheque Action can be taken against you if the check is declined 19 October 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं