Brightcom Group Share Price | करोडपती करणारा ब्राइटकॉम ग्रुपचा शेअर 68% घसरून 19 रुपयांवर आला, स्टॉकचं पुढे काय होणार?

Brightcom Group Share Price | एकेकाळी आपल्या गुंतवणुकदारांना करोडपती बनवणाऱ्या ‘ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड’ कंपनीचे दिवस फिरले आहेत. मागील बऱ्याच काळापासून या कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावाला सामोरे जात आहेत. आज सोमवार दिनांक 13 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 7.78 टक्के घसरणीसह 19.55 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील एक वर्षापासून या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना हैराण केले आहे. मागील एक वर्षात हा स्टॉक 68.09 टक्के कमजोर झाला आहे. तर मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या स्टॉकने आपल्या शेअर धारकांना 52.08 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. मागील पाच दिवसांत ‘ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 12.95 टक्के कमजोर झाले आहेत.
शेअरमध्ये पडझडीचे कारण :
‘ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स मागील एका वर्षात 68.09 टक्के कमजोर झाले आहेत. मागील वर्षी हा स्टॉक याच महिन्यात हा स्टॉक 108.98 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. ‘ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड’ कंपनीचे काही आर्थिक व्यवहार गुंतवणूकदारांचे नुकसान करू शकतात, अशी स्टॉक मार्केट नियामक चिंता सेबीने व्यक्त केली होती. त्यानंतर ‘ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड’ कंपनीच्या स्टॉकमध्ये घसरण सुरू झाली. या कंपनीच्या शेअर्समधील घसरणीमुळे गुंतवणूकदार खूप मोठ्या नुकसानीला सामोरे जात आहेत. सेबीने मागील वर्षी ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या आर्थिक बाबींचे फॉरेन्सिक ऑडिट करण्यासाठी ‘Deloitte Touche Tohmatsu India LLP’ या खाजगी फर्मची नियुक्ती केली होती.
ब्राइटकॉम ग्रुप शेअरहोल्डिंग पॅटर्न :
‘ब्राइटकॉम ग्रुप’ कंपनीच्या डिसेंबर 2022 मधील लेटेस्ट शेअरहोल्डिंग चार्ट पॅटर्ननुसार, दिग्गज गुंतवणूकदार विजय कुमार कंचर्ला यांच्याकडे ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे 2.16 टक्के भाग भांडवल म्हणजेच 4.36 कोटी शेअर्स आहेत. एम गांगी रेड्डी यांच्याकडे ‘ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड’ कंपनीचे 3.22 कोटी शेअर्स आहे. दिग्गज गुंतवणुकदार ‘शंकर शर्मा’ यांनी देखील कंपनीचे शेअर्स धारण केले होते, मात्र आता त्यांचे नाव शेअर धारकांच्या यादीत सामील नाही. कदाचित मागील तिमाहीत त्यांनी आपले शेअर्स विकले असावे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Brightcom Group Share Price return on investment check details on 13 March 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं