Brightcom Group Share Price | सलग 7 दिवस ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचा शेअर अप्पर सर्किट तोडतोय, नक्की कारण काय?

Brightcom Group Share Price | ‘ब्राइटकॉम ग्रुप’ कंपनीचे शेअर मागील एका वर्षात 80 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत. मात्र मागील काही दिवसांपासून ‘ब्राइटकॉम ग्रुप’ कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. मागील 7 दिवसांपासून स्टॉक सतत अप्पर सर्किट हीट करत आहे.
पाच वर्षांपूर्वी या कंपनीचे शेअर्स 2.33 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 10 डिसेंबर 2021 रोजी या कंपनीचे शेअर्स 117.66 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज बुधवार दिनांक 10 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.86 टक्के वाढीसह 12.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
या वर्षी आतापर्यंत YTD आधारे ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे शेअर्स 57 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत. मात्र आता बा स्टॉक तेजीत वाढत आहे. वास्तविक या कंपनीच्या शेअरमध्ये ही वाढ एका सकारात्मक बातमीमुळे पाहायला मिळत आहे. कंपनीने नुकताच डॉ सुरभी सिन्हा यांना नॉन एक्झिक्युटिव्ह इंडिपेंडंट डायरेक्टर या श्रेणीवर अतिरिक्त संचालक म्हणून पुनर्नियुक्त केले आहे. ही बातमी जाहीर झाल्यापासून ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे शेअर्स तेजीत धावत आहेत.
BSE वेबसाईटवर उपलब्ध आकडेवारीनुसार 2 मे 2023 रोजी ब्राइटकॉम कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 9.73 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 3 मे हा स्टॉक 10.21 रुपयांवर पोहोचला. मंगळवार दिनांक 9 मे रोजी हा स्टॉक 12.40 रुपयांवर पोहचला होता. मागील एका महिन्यात ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या शेअरने लोकांना 30 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. मागील 5 दिवसांत या कंपनीचे शेअर्स 20.47 टक्के वाढले आहेत.
मागील सहा महिन्यांत ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे शेअर्स 62.84 टक्के कमजोर झाले आहेत. दिग्गज गुंतवणूकदार शंकर शर्मा यांनी कंपनीचे 2.50 कोटी शेअर्स धारण केले आहेत. तर कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 72 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 9.35 रुपये होती.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Brightcom Group Share Price today on 10 May 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं