Canara Bank Share Price | सरकारी बँकेचा शेअर! कॅनरा बँकेच्या शेअरवरटार्गेट प्राईस जाहीर, तज्ज्ञांचा सल्ला आणि फायदा जाणून घ्या

Canara Bank Share Price | कॅनरा बँकेचे शेअर्स पुढील काळात मजबूत नफा देऊ शकतात, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. या सरकारी बँकेच्या शेअर्सबाबत तज्ञ उत्साही पाहायला मिळत आहेत. पुढील काळात या कंपनीचे शेअर्स 400 रुपये किंमत स्पर्श करू शकतात, असे तज्ञ म्हणतात. 36 पैकी 25 तज्ञांनी कॅनरा बँकेचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसने आपल्या अहवालात कॅनरा बँकेच्या स्टॉकवर 400 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. तर शेअर बाजारातील काही तज्ञांनी कॅनरा बँकेच्या शेअरवर 375 रुपये ही सरासरी लक्ष्य किंमत जाहीर केली आहे.
कॅनरा बँकेच्या स्टॉकवर स्ट्रॉग बाय रेटिंग देणारे एकूण 7 तज्ञ आहेत, आणि बाय रेटिंग देणारे एकूण 3 तज्ञ आहेत. तर दोन तज्ञांनी स्टॉक होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. या कंपनीचे शेअर सध्या 297.40 रुपयेच्या आसपास ट्रेड करत आहे.
प्रवर्तकांनी कॅनरा बँकेचे 62.93 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. तर परकीय गुंतवणूकदारांनी या बँकेचे 8.95 टक्के धारण केले आहेत. देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी कॅनरा बँकेचे 16.33 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. तर इतर गुंतवणूकदारांनी कॅनरा बँकेचे 12.20 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.
कॅनरा बँक शेअर किंमत इतिहास
कॅनरा बँकेच्या शेअरने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 59.68 टक्के नफा कमावून दिला आहे. 2023 मध्ये कॅनरा बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 11.50 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. कॅनरा बँकेच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 341.70 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 178.45 रुपये होती. कॅनरा बँक ही क्रेडिट कार्डद्वारे UPI पेमेंट सुविधा देणारी सार्वजनिक क्षेत्रातील पहिली बैंक म्हणून ओळखली जाते.
RuPay क्रेडिट कार्डद्वारे व्यापाऱ्यांसाठी UPI पेमेंट सुविधा सुरू करणारी पहिली बँक कॅनरा बँक होती. कॅनरा बँकेने माहिती दिली की, कॅनरा बँकेने RuPay क्रेडिट कार्डद्वारे व्यापाऱ्यांसाठी UPI पेमेंट करण्याची सुविधा लाँच केली आहे. कॅनरा बँकेच्या लोकप्रिय कॅनरा एआय बँकिंग सुपर अॅपवर या सर्व सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत. NPCI च्या सहकार्याने ही नवीन UPI सुविधा सुरू करण्याचा मान कॅनरा बँकेला जात आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Canara Bank Share Price today on 29 June 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं