Cancel Cheque | कॅन्सल चेक देण्याची अनेकदा वेळ येते, पण तो देताना तुम्ही या चुका तर करत नाही ना?, गैरफायदा घेतला जाऊ शकतो

Cancel Cheque | अनेक आर्थीक व्यवहार करताना तुम्हाला कॅन्सल चेकची गरज भासते. कोणत्याही प्रकारचे लोन घेताना देखील अशा चेकची मागणी केली जाते. कॅन्सल चेक देताना अनेक गोष्टी विचारात घेणे गरजेचे आहे. मात्र बहूतेक व्यक्ती शुल्लक चूका करतात ज्याचा भविष्यात त्यांना विनाकारण त्रास सहण करावा लागतो. त्यामुळे या बातमीतून कॅन्सल चेक देताना कोणत्या चूका टाळणे गरजेचे आहे हे जाणून घेऊ.
कॅन्सल चेक कसा असतो
आर्थिक व्यवहार करताना अनेक ठिकाणी हा चेक मागितला जातो. मात्र याचा खरोखर वापर केला जात नाही. यावर बॅंकेचा आयएफसी कोड आणि खात्याचा क्रमांक असतो. हा चेक देत असताना त्याच्या मध्यभागी दोन तिरक्या रेषा आखाव्यात आणि निळी शाई असलेल्या पेनाने त्यावर कॅन्सल लिहावे. हे लिहित असताना इतर कोणत्याही रंगाच्या शाईचा पेन वापरू नये. त्यामुळे चेक बाद समजला जाऊ शकतो. तसेच त्यावर कोणतेही खाडाखोड नसने गरजेचे आहे. हा चेक फक्त तुमचे खाते व्हेरिफाय करण्यासाठी वापरला जातो. जेव्हा तुम्हाला पीएफ मधून पैसे काढायचे असतात तेव्हा देखील या चेकची गरज पडते. तसेत विमा कंपनी देखील असे चेक घेतात.
या चूका आवश्य टाळा
चेकवर कधीच सही करू नये. तसेच कोणत्याही व्यक्तीला तो देऊ नये. त्याचा वापर करून तुमच्या खात्यातील पैसे काढून घेतले जाऊ शकतात. कारण या चेकवर तुमचा खाते क्रमांक आणि आयएफसी कोड असतो. त्यामुळे चेक चुकीच्या व्यक्तीच्या हातात जाणार नाही याची काळजी घ्या.
या ठिकाणी कॅन्सल चेकची होते मागणी
बॅंकेचे केव्हायसी, म्युच्युअल फंड, ईएमआय, बॅंकेकडून कर्ज घेणे, डी मॅट खाते उघडताना, विमा घेताना, नविन ठिकाणी नोकरीसाठी, ईपीएफओ खात्यासाठी कॅन्सल चेक मागितला जातो.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Cancel Cheque precautions need to remember check details 14 October 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं