CCD Share Price | सीसीडी'च्या महागड्या 'कॉफी' पेक्षा टपरीवरचा चहा अधिक आनंद देतो, पण CCD चा स्वस्त शेअर परताव्याचा आनंद देतोय

CCD Share Price | भारतातील प्रसिद्ध कॅफे चेन कॅफे कॉफी डे च्या दिवाळखोरी प्रक्रियेला स्थगिती देण्यात आलेली आहे. मागील काही दिवसांपासून कॅफे कॉफी डे एंटरप्रायझेस या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी कॅफे कॉफी डे कंपनीचे शेअर्स 4 टक्के वाढीसह ओपन झाले होते. दिवसा अखेर हा स्टॉक 2.60 टक्के वाढीसह 37.07 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
2015 नंतर कॅफे कॉफी डे कंपनीच्या शेअरची किंमत 87 टक्के कमजोर झाली आहे. 2015 मध्ये या कंपनीचे शेअर्स 275 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 16 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.97 टक्के वाढीसह 39.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
राष्ट्रीय कंपनी कायदा अपील न्यायाधिकरण म्हणजेच NCLAT च्या चेन्नई खंडपीठाने पुढील सुनावणीपर्यंत कॅफे कॉफी डे कंपनीची दिवाळखोरी प्रक्रिया थांबवली आहे. एनसीएलएटीच्या दोन न्यायाधीशांच्या चेन्नई खंडपीठाने अंतरिम आदेशात रिझोल्यूशन प्रोफेशनल आणि त्याची आर्थिक कर्जदाता असलेली इंडसइंड बँकेला कळवले आहे की, एनसीएलटीच्या बेंगळुरू खंडपीठाने दिवाळखोरी प्रक्रियेला तूर्तास स्थगिती दिली आहे.
NCLAT ने अंतरिम रिझोल्यूशन प्रोफेशनल आणि इंडसइंड बँकेला 25 ऑगस्ट 2023 पर्यंत दोन आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 20 सप्टेंबर 2023 रोजी नियोजित करण्यात आली आहे. न्यायमूर्ती राकेश कुमार जैन आणि श्रीशा मेर्ला याच्या खंडपीठाने निर्णय दिला आहे की, पुढील सुनावणीच्या तारखेपर्यंत कॅफे कॉफी डे कंपनी दिवाळखोरी प्रक्रिया स्थगित ठेवली जाईल.
एनसीएलएटीने जो दिवाळखोरी प्रक्रिया स्थगित करण्याचा आदेश दिला आहे, तो सीडीजीएल कंपनीचे निलंबित संचालक आणि दिवंगत एमडी व्हीजी सिद्धार्थ यांच्या पत्नी मालविका हेगडे यांनी केलेल्या याचिकेवर दिला आहे. 20 जुलै 2023 रोजी कॅफे कॉफी डे कंपनीच्या कर्जदात्या इंडसइंड बँकेच्या याचिकेवर एनसीएलटीने दिवाळखोरी प्रक्रिया सुरू केली होती. या याचिकेत कॅफे कॉफी डे कंपनीने इंडसइंड बँकेचे 94 कोटी रुपये कर्ज थकित ठेवल्याचा दावा केला आहे.
जुलै 2019 मध्ये कॅफे कॉफी डे कंपनीचे संस्थापक आणि चेअरमन व्हीजी सिद्धार्थ यांनी आत्महत्या केली होती. त्यांच्या निधनानंतर कॉफी डे एंटरप्रायझेस कंपनी आर्थिक संकटात सापडली होती. आर्थिक संकट सुरू असून देखील कंपनीच्या कर्जात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.
कॅफे कॉफी डे कॉफी डे कंपनीच्या अंतर्गत भारतात 158 शहरामध्ये 495 कॅफे कॉफी डे आउटलेट आणि 285 CCD व्हॅल्यू एक्सप्रेस किऑस्क चालू आहेत. याव्यतिरिक्त कॅफे कॉफी डे कंपनीने विविध कॉर्पोरेट कार्यस्थळे, ऑफीस, आणि गर्दीच्या ठिकाणी, हॉटेल्समध्ये देखील 38,810 कॉफी व्हेंडिंग मशीन स्थापन केले आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | CCD Share Price today on 16 August 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं