Cell Point India IPO | सेल पॉइंट इंडिया IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार, फायदा घेण्यासाठी शेअरचा तपशील जाणून घ्या

Cell Point India IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून भरघोस कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सेल पॉइंट इंडिया कंपनीचा IPO 15 जून 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. गुंतवणूकदार या कंपनीच्या IPO मध्ये 20 जून 2023 पर्यंत गुंतवणूक करू शकतात. सेल पॉइंट इंडिया कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची प्राइस बँड 100 रुपये प्रति शेअर जाहीर केली आहे.
सेल पॉइंट इंडिया IPO तपशील
सेल पॉइंट इंडिया कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 100 रुपये प्रति शेअर ठरवली आहे. तर कंपनी आपल्या IPO मध्ये एका लॉट अंतर्गत 1200 शेअर्स जारी करणार आहे. म्हणजेच गुंतवणूकदाराना एक लॉट खरेदी करण्यासाठी 1,20,000 रुपये जमा करावे लागणार आहे. सेल पॉइंट इंडिया कंपनीचे शेअर्स NSE SME इंडेक्सवर सूचीबद्ध केले जाणार आहेत. या IPO लिस्टिंगनंतर कंपनीमध्ये प्रवर्तकांकडे 73.06 टक्के भाग भांडवल शिल्लक राहील.
सेल पॉइंट इंडिया GMP
ग्रे मार्केटचा आढावा घेणाऱ्या तज्ज्ञांच्या मते सेल पॉइंट इंडिया कंपनीचा IPO स्टॉक 12 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहे. जर हा ट्रेंड पुढे चालू राहिला तर सेल पॉइंट इंडिया कंपनीचे शेअर्स 112 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात. सेल पॉइंट इंडिया कंपनीचे IPO शेअर्स 23 जून 2023 रोजी वाटप केले जातील. आणि कंपनीचे शेअर्स 29 जून 2023 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध केले जातील.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Cell Point India IPO today on 14 June 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं