Credit Card | क्रेडिट कार्ड घेण्याआधी स्वतःला विचारा हे प्रश्न, नुकसान होणार नाही आणि मिळतील अनेक फायदे - Marathi News

Credit Card | तुमच्यापैकी बऱ्याच व्यक्तींनी आत्तापर्यंत क्रेडिट कार्डचा वापर नक्कीच केला असेल. क्रेडिट कार्डमुळे तुम्हाला अनेक फायद्यांचा लाभ घेता येतो. शॉपिंग, ट्रॅव्हलिंग किंवा दररोजच्या वापरातील खर्च तुम्ही क्रेडिट कार्डने करू शकता. आज आम्ही या लेखातून तुमचा खर्चाचा कल पाहून कोणतं क्रेडिट कार्ड खरेदी करायला हवं हे सांगणार आहोत.
क्रेडिट कार्ड घेण्याआधी स्वतःला एक प्रश्न विचारा :
तुम्ही सर्वप्रथम क्रेडिट कार्ड घेण्याचा विचार करत असाल तर स्वतःला एक प्रश्न आवर्जून विचारला पाहिजे तो म्हणजे तुम्हाला क्रेडिट कार्ड कोणत्या गोष्टीसाठी लागत आहे. तुम्हाला क्रेडिट कार्डची खरंच गरज आहे का केवळ मित्र-मैत्रिणी क्रेडिट कार्ड वापरत आहेत म्हणून मला देखील वापरायचं आहे असा तुमचा हेतू तर नाही ना. अशा सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्ही शोधून काढली पाहिजे. समजा तुम्ही क्रेडिट कार्ड घेत असाल तर, तुम्ही एक प्रकारचं कर्ज घेत आहात आणि काही वेळानंतर तुम्हाला शॉपिंग केलेले पैसे फेडायचे आहेत ही गोष्ट लक्षात ठेवा.
कोणता क्रेडिट कार्ड घ्यावं :
तुम्ही तुमच्या खर्चाच्या कलानुसार क्रेडिट कार्ड घेण्याचा विचार. म्हणजेच तुमचा ज्या गोष्टीचा जास्तीत जास्त खर्च होत आहे ज्यामध्ये ट्रॅव्हलिंग, शॉपिंग यांसारखा समावेश असू शकतो. तर, तुमचा ट्रॅव्हलिंगमध्ये जास्त खर्च होत असेल तर, तुम्ही ट्रॅव्हल कार्ड किंवा पेट्रोल कार्ड घेण्याचा विचार करावा. जर तुम्हाला शॉपिंग करायला जास्त आवडत असेल आणि तुमचा जास्तीचा खर्च शॉपिंग करण्यातच होत असेल तर तुम्ही शॉपिंग कार्ड खरेदी करू शकता.
ईएमआयवर शॉपिंग करू शकता :
क्रेडिट कार्डवर तुम्हाला चमत्कारिक फीचर्सचा अनुभव घेता येतो. यावर तुम्ही ईएमआय वरून तुमच्या आवडीचे सामान खरेदी करू शकता. एवढंच नाही तर तुम्ही तुमची बिले ईएमआयमध्ये बदलवून घेऊ शकता. फक्त एका गोष्टीची काळजी घ्या ती म्हणजे तुम्ही ईएमआयवर जास्तीची शॉपिंग करू नका. नाहीतर जास्तीच्या ईएमयच्या चक्करमध्ये तुम्ही कर्जबाजारी देखील होऊ शकता. त्यामुळे ईएमआयवर शॉपिंग करण्याची खरच गरज आहे की नाही हे देखील तपासा.
रिवॉर्ड पॉईंट्सचा फायदा उचला :
क्रेडिट कार्डवर रिवॉर्ड पॉईंट्स मिळतात हे प्रत्येक व्यक्तीला माहित आहे. परंतु वेगवेगळ्या क्रेडिट ट्रांजेक्शनवर वेगवेगळे रिवॉर्ड पॉईंट्स मिळतात. समजा तुम्ही डायनिंगमध्ये 100 रुपये खर्च केले तर तुम्हाला 10 रुपये रिवॉर्ड पॉईंट मिळतात. तर, तर तुम्ही सर्वातआधी जास्तीचे रिवॉर्ड पॉईंट कुठे मिळतात हे शोधून काढलं पाहिजे. जेणेकरून तुम्ही त्या ठिकाणी क्रेडिट कार्डचा जास्तीत जास्त वापर करू शकाल.
सिबिल स्कोर सुधारण्यासाठी क्रेडिट कार्डचा किती करावा वापर :
क्रेडिट कार्डच्या दिलेल्या लिमिटनुसार तुम्ही कार्डचा वापर केला पाहिजे. समजा क्रेडिट कार्डची लिमिट 1 लाख रुपये आहे आणि तुम्ही 80 हजार किंवा 95 हजारांची लिमिट क्रॉस केली असेल, तर हा पॉईंट ऑफ व्यूव तुमच्यासाठी निगेटिव्ह ठरू शकतो. क्रेडिट कार्ड कंपन्या अशा ग्राहकांना जास्तीचे कर्ज घेणारे ग्राहक समजतात. ज्याचा थेट परिणाम तुमच्या सिबिल स्कोरवर होताना पाहायला मिळतो.
तुम्ही किती क्रेडिट कार्ड ठेवू शकता :
काही ग्राहक एकापाठोपाठ भरपूर क्रेडिट कार्ड घेऊन ठेवतात. समजा तुमच्याकडे 10 क्रेडिट कार्ड उपलब्ध आहेत. त्यामधील एका क्रेडिट कार्डची लिमिट 1 लाख रुपयांची आहे. म्हणजेच दहा क्रेडिट कार्डच्या हिशोबाने तुमच्याकडे 10 लाख क्रेडिट कार्डची लिमिट होऊन जाते. परंतु तुम्ही या क्रेडिट कार्डचा वापर जास्तीच्या खर्चासाठी केला नाही पाहिजे. नाहीतर क्रेडिट कार्ड कंपन्यांना वाटेल की, हा ग्राहक पूर्णपणे कर्जावरच अवलंबून आहे.
पेमेंटसाठी किती वेळ दिला जातो :
वेगवेगळ्या क्रेडिट कार्डवर पेमेंट करण्यासाठी तुम्हाला 30 ते 45 दिवसांचा वेळ दिला जातो. अशातच तुम्ही कॅश देऊन पेमेंट करत असाल तर तुम्हाला त्वरित पैसे द्यावे लागतात. बरोबर तुम्ही ऑनलाईन पेमेंट करत असाल तरीसुद्धा तुमच्या खात्यातून लगेचच पैसे कापले जातात. अशावेळी तुम्ही क्रेडिट कार्ड घेतानाच जास्तीच्या वेळेचं क्रेडिट कार्ड घ्या. जेणेकरून तुम्हाला पेमेंट करण्यासाठी देखील जास्तीचा कालावधी मिळेल.
बिल वेळेवर फेडलं नाही तर काय होईल :
समजा एखाद्या ग्राहकाने वेळेवर बिल भरलं नाही तर, क्रेडिट कार्ड कंपनी त्यांच्याकडून जास्तीचे व्याजदर आकरते. अशा स्थितीत क्रेडिट कार्ड वापरकर्त्याचे प्रचंड नुकसान देखील होते.
Latest Marathi News | Credit Card application 11 October 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं