Credit Card | तुमच्या क्रेडिट कार्डवर आकारले जाणारे हे 5 शुल्क तुम्हाला माहित आहेत का?, हे गुप्त चार्जेस नेहमी लक्षात ठेवा, नुकसान टाळा

Credit Card| तुम्हाला आपल्या आसपास बरेच क्रेडिट कार्ड वापरणारे लोक भेटतील. आणि क्रेडिट कार्डचे अनेक फायदे आहेत, त्यातील एक म्हणजे रिवॉर्ड पॉइंट्स. तुम्ही जेव्हा क्रेडिट कार्डचा वापर करता तेव्हा तुम्हाला काही पॉइंट्स दिले जातात. याचा वापर तुम्ही भविष्यात खरेदी करताना करू शकता. विविध फायदे आणि डिस्काउंट, स्कीम यांचे कडे आकर्षित होऊन अनेक लोक क्रेडिट कार्ड घेतात. लक्षात ठेवा कधीही कोणत्याही गोष्टीचे फायदे मोफत मिळत नसतात, यासाठी थोडीफार किंमत मोजावीच लागते. सर्व क्रेडिट कार्डांवर काही शुल्क आकारले जातात, हे बँक एजंट किंवा क्रेडिट कार्ड कंपनी तुम्हाला सांगत नाहीत. त्यामुळे कोणाच्याही नादी लागून क्रेडिट कार्ड घेऊ नका, आधी सर्व माहिती जाणून घ्या, क्रेडिट कार्डवरील शुल्कांबद्दल जाणून घ्या, मगच क्रेडिट कार्ड घ्या.
क्रेडिट कार्डवरील वार्षिक शुल्क :
सुरुवातीला तुम्हाला क्रेडिट कार्ड मोफत ऑफर केले जातात. आणि मोफत क्रेडिट कार्डची ऑफर एका वर्षात संपते, त्यानंतर तुमच्या कार्डचा प्रकार आणि क्रेडिट लिमिटनुसार घसघशीत वार्षिक शुल्क आकारले जाते. वेगवेगळ्या बँका वेगवेगळ्या दराने वार्षिक शुल्क आकारतात. सहसा वार्षिक शुल्क 500 ते 3,000 रुपयांपर्यंत असू शकते. तथापि, अशा काही बँका आहेत ज्या तुम्ही विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरल्यासही शुल्क आकारत नाहीत किंवा हा दंड आकारात नाहीत. अशा परिस्थितीत, क्रेडिट कार्ड घेण्यापूर्वी, आपण त्याच्या वार्षिक शुल्काची माहिती जाणून घेतली पाहिजे.
उशिरा पेमेंट भरण्यावर शुल्क :
जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरून त्याचे बिल वेळेवर भरत नसाल तर तुम्हाला उशिरा पेमेंट करण्यावरही शुल्क बँकेकडून दंड आकारले जाईल. तथापि, जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे घेतलेल्या कर्जाची रक्कम ठरलेल्या काळात भरत नाही तेव्हा हे शुल्क आकारले जाते. अशा स्थितीत क्रेडिट कार्ड कंपन्या ग्राहकाने केलेल्या प्रत्येक उशिरा पेमेंटवर प्रचंड मोठ्याप्रमाणात व्याज आकारतात.
रोख पैसे काढण्याचे शुल्क :
क्रेडिट कार्डचा वापर करून तुम्ही जे पैसे खर्च करता ते एक प्रकारचे कर्ज असते. अशा परिस्थितीत जर तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर करून पैसे काढले तर पैसे काढल्याच्या दिवसापासून त्यावर व्याज आकारले जाईल. म्हणजे जर तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर करून एखादी वस्तू खरेदी केली, तर तुम्हाला देय तारखेच्या आत व्याजाशिवाय पैसे द्यावे लागतील, परंतु जर तुम्ही क्रेडिट कार्डमधून रोख रक्कम काढली, तर तुम्हाला त्याच दिवसापासून रक्कम परतफेड करेपर्यंत व्याज द्यावे लागेल. याची माहिती बहुतेकांना नसते.
परदेशी व्यवहार शुल्क :
जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्ड घेता तेव्हा तुम्हाला ते परदेशातही वापरण्याची सुविधा दिली जाते. जर तुम्ही परदेशात क्रेडीट कार्डचा वापर केला तर तुमच्यावर जास्त शुल्क आकारले जाईल, याची माहिती बऱ्याच लोकांना नसते. आपल्या देशातील शुल्क आणि परदेशातील शुल्क वेगळे असते. परदेशातील व्यवहारावर जास्त शुल्क आकारले जाते. अश्यावेळी परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर क्रेडिट कार्ड वापरण्यापूर्वी क्रेडिट कार्ड कंपनीकडून सर्व शुल्काची माहिती जाणून घ्या.
पेट्रोल आणि रेल्वे तिकिटांवर अतिरिक्त शुल्क :
जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर करून पेट्रोल, रेल्वे तिकीट, किंवा अन्य खरेदी करता त्यावर तुम्हाला अतिरिक्त फी आकारली जाते. बऱ्याच लोकांना या बद्दल माहिती नसते की पेट्रोल आणि रेल्वे तिकीट खरेदीवर अतिरिक्त शुल्क आकारले जाते, म्हणून लोकांचे क्रेडिट कार्ड बिल वाढलेले असते. क्रेडिट कार्ड तुम्हाला कर्ज सुविधा देतात, त्याचा वापर गरजेचा वेळीच करावा जेणेकरून तुम्हाला अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Credit card Use and hidden charges to know before using and withdrawing money by using credit card 1 October 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं