Credit Card | तरुणाई अडकली आहे क्रेडिट कार्डच्या खरेदीत, भारतात तरुणाई क्रेडिट कार्डला देतेय खूप महत्व, कारण?

Credit Card | कोरोना महामारीमुळे बॅंकींग व्यवसाय देखील मंदावला होता. अनेक व्यक्ती क्रेडिटकार्ड वापरणे टाळत होते. मात्र या वर्षी गेल्या तिमाहीचा अहवाल पाहता तरुण वर्ग जास्त प्रमाणात क्रेडीट कार्ड वापरताना दिसत आहे. साल २०२२ मध्ये १८ ते ३० या वयोगटातील क्रेडिटकार्ड वापरणा-यांची संख्या ३२ टक्के झाली आहे. २०२० च्या तुलनेत २०२२ मध्ये क्रेडिटकार्ड वापरण्याची टक्केवारी २२ टक्क्यांहून अधीक झाली आहे.
कोरोना महामारीत आलेल्या अनुभवामुळे बॅंका असुरक्षीत कर्ज म्हणजेच क्रेडिटकार्डसाठी आधिक काम करत होत्या त्यामुळे प्रत्येक महिन्यात १५ लाखांहून अधिक क्रेडिटकार्ड जारी करण्यात आले होते. भातरीय झर्व्ह बॅंकेने देखील यासंदर्भात मार्गदर्शक तत्वे दिली होती.
RBI ची मार्गदर्शक तत्वे
क्रेडिटकार्ड जारी केल्यानंतर जर ३० दिवसांच्या आत त्याचे बिल भरले गेले नाही तर त्याचे कार्ड बंद करणे. कार्ड बंद करुनही त्या व्यक्तीने पैसे भरणे गरजेचे. तसेच क्रेडिट कंपनीला याची माहिती ३० दिवसांच्या आत कळवणे. यावर असलेल्या गोष्टी अपडेट करणे.
जुलै महिन्यात भरमसाठ खर्चाची नोंद
आरबीआयने दिलेल्या अहवालात असे म्हटले आहे की, भारत देश इतर सर्व देशांना क्रेडिटकार्ड खरेदीत मागे टाकत चालला आहे. २०२२ जुलैमध्ये अनेकांनी क्रेडिटकार्डवर तब्बल १.१५ लाख कोटींची खरेदी केली आहे. मागिल रेकॉर्ड तपासता ही एका महिन्यातील सर्वाधीक विक्री आहे. साल २०२०-२१ या वर्षात क्रेडिटकार्डवर ६३०,४१४ कोटी रुपयांचा खर्च झाला. तर साल २०२१—२ या वर्षात ९७१,६३८ केटी रुपयांचा खर्च नोंदवण्यात आला आहे.
थकित बिलांमध्ये झाली वाढ
ICICI ने देखील या संदर्भात त्यांचा अहवाल जारी केला आहे. यात म्हटले आहे की, २०२१ च्या डिसेंबरपेक्षा यंदाची थकबाकी अधिक आहे. डिसेंबरमध्ये प्रत्येक क्रेडिटकार्डचा विचार केला तर १८ हजारांची थकबाकी येत होती. तर यंदा जूनमध्ये १९,४०० एवढी थकबाकी आहे. त्यामुळे मे महिन्यात याची नोटीस बजावण्यात आली. मात्र आजूनही २३.२ टक्के थकबाकी आहे.
तरुणाईचा कल क्रेडिटकार्डच्या दिशेने जास्त
गेल्या दोन वर्षांपासून क्रेडिटकार्ड खरेदीत तरुणाई जास्त दिसत आहे. सातत्याने यात वाढ होत आहे. २०२२ मधील १८ ते ३० वयोगटाचे नागरिक ३२ टक्के आहेत. जे क्रेडिटकार्ड वापरतात. हा आकडा २०२० च्या तुलनेत २२ टक्क्यांनी वाढल्याचे दिसत आहे. हा अहवाल ट्रान्सयुनियने दिला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title : Credit Card Youth is stuck in credit card purchases 02 November 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं