Deepak Nitrite Share Price | मालामाल करणाऱ्या शेअरच्या रेटिंगमध्ये बदल, अत्यंत स्वस्त प्राईसवर खरेदी करता येणार

Deepak Nitrite Share Price | दीपक नायट्रेट या केमिकल क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. 23 मे रोजी या कंपनीचे शेअर्स 5 टक्केपेक्षा जास्त घसरणीसह क्लोज झाले होते. मागील 2 दिवसात या कंपनीचे शेअर्स 7.25 टक्के खाली आले होते.
या कंपनीच्या शेअर्समध्ये मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केल्यानंतर घसरण पहायला मिळाली होती. अनेक ब्रोकरेज फर्मनी या कंपनीच्या शेअरवर मंदीचा दृष्टिकोन व्यक्त केला आहे. शुक्रवार दिनांक 24 मे 2024 रोजी दीपक नायट्रेट स्टॉक 1.07 टक्के वाढीसह 2,360 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
दीपक नायट्रेट कंपनीने 20 मे 2024 रोजी आपले मार्च तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले होते. मार्च तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा मागील वर्षीच्या तुलनेत 8.5 टक्क्यांच्या वाढीसह 253.85 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. या निव्वळ नफ्यात 51.6 कोटी रुपये असाधारण नफा देखील सामील आहे. हा नफा कंपनीला विमा दाव्यामुळे प्राप्त झाला होता. हा असाधारण नफा वगळल्यास कंपनीचा निव्वळ नफा मागील वर्षीच्या तुलनेत 14 टक्के कमी होईल.
मागील एका वर्षभरात दीपक नायट्रेट कंपनीच्या शेअर्सची किंमत 9.32 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. मुख्यतः स्वस्त किमतीत चीनकडून मोठ्या प्रमाणावर होणारी आयात, तांबड्या समुद्रात निर्माण झालेले संकट आणि केमिकल बाजारातील कमजोरी यामुळे दीपक नायट्रेट कंपनीसाठी अनेक व्यावसायिक आव्हाने निर्माण झाली होती. तज्ञांच्या मते, आर्थिक वर्ष 2024-2025 च्या पहिल्या सहामाहीनंतरच या कंपनीच्या कामगिरीत सुधारणा पाहायला मिळू शकते.
मार्च 2024 तिमाहीत दीपक नायट्रेट कंपनीच्या महसुलात मागील वर्षीच्या तुलनेत 16 टक्क्यांची घट नोंदवली गेली आहे. या तिमाही निकालानंतर ब्रोकरेज फर्म प्रभुदास लिल्लाधर फर्मच्या तज्ञांनी दीपक नायट्रेट स्टॉकवर ‘रिड्यूस’ रेटिंग जाहीर केली आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 2,268 रुपये किमतीवर जाऊ शकतात. ब्रोकरेज फर्मला अपेक्षा आहे की, या कंपनीच्या मार्जिनवर दबाव कायम राहू शकतो. एचडीएफसी सिक्युरिटीज फर्मने दीपक नायट्रेट स्टॉक 1,537 रुपये टार्गेट प्राइससाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Deepak Nitrite Share Price NSE Live 25 May 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं