Delta Corp Share Price | डेल्टा कॉर्प शेअर्स एक दिवसात 8 टक्के वाढले, सकारात्मक बातमीमुळे शेअरमध्ये सुसाट तेजी

Delta Corp Share Price | डेल्टा कॉर्प कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवारी जबरदस्त तेजी पाहायला मिळत होती. शुक्रवारी डेल्टा कॉर्प कंपनीचे शेअर 8 टक्क्यांच्या वाढीसह 154.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. डेल्टा कॉर्प कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे 2 मुख्य कारणा आहे. डेल्टा कॉर्प कंपनीने पेनिन्सुला लँडसह संयुक्त उपक्रमाद्वारे रिअल इस्टेट क्षेत्रात व्यवसाय करण्याची घोषणा केली आहे.
डेल्टा कॉर्प कंपनीला कलकत्ता उच्च न्यायालयाने 6236.81 कोटी रुपयेच्या प्रकरणात जरी केलेल्या कारणे दाखवा नोटीसवर अंतरिम स्थगिती दिली आहे. शुक्रवार दिनांक 1 डिसेंबर 2023 रोजी डेल्टा कॉर्प स्टॉक 2.19 टक्के वाढीसह 144.75 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
डेल्टा कॉर्प कंपनीने पेनिन्सुला लँडमध्ये 100 कोटी रुपये गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. पेनिन्सुला लँड कंपनी डेल्टा कॉर्प कंपनीला गुंतवणुकीच्या बदल्यात 1.5 कोटी इक्विटी शेअर्स आणि 77.27 लाख सीसीडी 44 रुपये किमतीवर जारी करणार आहे. डेल्टा कॉर्प आणि पेनिन्सुला लँड देखील 250 कोटी रुपये गुंतवणूक करून एक संयुक्त उपक्रम स्थापन करणार आहे. यामध्ये डेल्टा कॉर्प कंपनीकडे बहुसंख्य भाग भांडवल असेल. या संयुक्त उपक्रमामुळे डेल्टा कॉर्प कंपनीला व्यवसाय विस्तार करण्याची संधी मिळेल.
डेल्टा कॉर्प कंपनीच्या शेअर्सने मागील 6 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांचे 40 टक्के नुकसान केले आहे. 11 जुलै 2023 रोजी डेल्टा कॉर्प कंपनीचे शेअर्स 246.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 1 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 154.15 रुपये किमतीवर पोहोचले होते. 2023 यावर्षात डेल्टा कॉर्प कंपनीच्या शेअरची किंमत 32 टक्के कमजोर झाली आहे. डेल्टा कॉर्प कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 259.95 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 124.60 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Delta Corp Share Price NSE 02 December 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं