Dividend Stocks | एक्सेल्या सॉल्यूशंस इंडिया शेअर्स गुंतवणुकदारांना भरघोस लाभांश मिळणार, रेकॉर्ड तारीखपूर्वी खरेदी करून फायदा घ्या

Dividend Stocks | एक्सेल्या सॉल्यूशंस इंडिया लिमिटेड ही कंपनी चालू आठवड्यात एक्स-डिव्हिडंड स्टॉक म्हणून ट्रेड करणार आहे. नुकताच एक्सेल्या सॉल्यूशंस इंडिया लिमिटेड कंपनीने आपल्या पात्र गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरवर 30 रुपये लाभांश वाटप करण्याचा निर्णय घेतला होता.
मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 3 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 3 ऑक्टोबर 2023 रोजी एक्सेल्या सॉल्यूशंस इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2.58 टक्के वाढीसह 1,672.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
रेकॉर्ड डेट तपशील
एक्सेल्या सॉल्यूशंस इंडिया लिमिटेड कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरवर 300 टक्के लाभांश वाटप करणार आहे. म्हणजेच पात्र गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरवर 30 रुपये लाभांश दिला जाणार आहे. कंपनीने लाभांश वाटप करण्याची पात्रता निश्चित करण्यासाठी रेकॉर्ड तारीख म्हणून 6 ऑक्टोबर 2023 हा दिवस निश्चित केला आहे.
शेअरची कामगिरी
मागील आठवड्यात शुक्रवारी एक्सेल्या सॉल्यूशंस इंडिया लिमिटेड कंपनीचे.शेअर्स 3.41 टक्क्यांच्या वाढीसह 1631.20 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 29 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे.
मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 40 टक्के वाढवले आहेत. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 1749.95 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 1042.85 कोटी रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2432.77 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Dividend Stocks of Accelya Solutions India Share Price 03 October 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं