Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला

Droneacharya Share Price | ड्रोन आचार्य एरियल इनोव्हेशन कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 7 टक्के वाढीसह 177.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 27 ऑक्टोबर 2023 रोजी ड्रोन आचार्य एरियल इनोव्हेशन कंपनीचे शेअर 221 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. ( ड्रोन आचार्य एरियल इनोव्हेशन कंपनी अंश )
21 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 121 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. आज शुक्रवार दिनांक 19 एप्रिल 2024 रोजी ड्रोन आचार्य एरियल इनोव्हेशन स्टॉक 1.36 टक्के वाढीसह 174.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
नुकताच ड्रोन आचार्य एरियल कंपनीने सीबीएआय टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसोबत एक करार केला आहे. या करारामध्ये तीन वर्षांत 200 प्रकारचे प्रमाणित प्रशिक्षण ड्रोन खरेदी केले जाणार आहेत. नुकताच एका मुलाखतीत केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भारताला 1 लाख ड्रोन पायलटची आवश्यकता असल्याची माहिती दिली होती. या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर ड्रोन आचार्य एरियल इनोव्हेशन कंपनीने CBAI टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसोबत तीन वर्षात 200 प्रकारचे प्रमाणित प्रशिक्षण ड्रोन खरेदी करण्यासाठी धोरणात्मक सहकार्य करार केला आहे.
ड्रोन आचार्य एरियल इनोव्हेशन कंपनीने आपले DGCA प्रमाणित ड्रोन पायलट प्रशिक्षण केंद्र पुणे येथे सुरू केले आहे. या कंपनीने पंजाब, गुजरात आणि राजस्थानमध्ये देखील केंद्रे सुरू करण्यासाठी विविध संस्थांसोबत करार केल्याची माहिती दिली आहे.
ड्रोन आचार्य एरियल इनोव्हेशन कंपनीचा IPO डिसेंबर 2022 मध्ये लाँच करण्यात आला होता. या IPO मध्ये शेअर्सची इश्यू किंमत 52 ते 54 रुपये दरम्यान निश्चित करण्यात आली होती. 23 डिसेंबर 2022 रोजी ड्रोन आचार्य एरियल इनोव्हेशन कंपनीचे शेअर्स 90 टक्के प्रीमियम वाढीसह सूचीबद्ध झाले होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Droneacharya Share Price NSE Live 19 April 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं