Federal Bank Share Price | फेडरल बँकेच्या शेअरमधून अल्पावधीत FD पेक्षा जास्त परतावा मिळेल, टार्गेट प्राईस तपासून घ्या

Federal Bank Share Price | कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये फेडरल बँकेचे शेअर्स 158.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज या बँकिंग स्टॉकमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये फेडरल बँक स्टॉक 155.65 रुपये किमतीवर ओपन झाला होता.
अल्पावधीत हा स्टॉक वाढून 158.95 रुपये किमतीवर पोहचला होता. आज बुधवार दिनांक 6 डिसेंबर 2023 रोजी फेडरल बँक स्टॉक 0.86 टक्के घसरणीसह 155.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
2023 या वर्षात फेडरल बँक स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 15 टक्के परतावा कमावून दिला आहे. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणुकदार रेखा राकेश झुनझुनवाला यांनी फेडरल बँकेचे 4.82 कोटी शेअर्स होल्ड केले आहेत. फेडरल बँकेत त्यांनी एकूण 2.01 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत.
याशिवाय दिवंगत गुंतवणुकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये फेडरल बँकेचे 2.45 कोटी शेअर्स आहेत. राकेश झुनझुनवाला यांचे शेअर्स बँकेच्या एकूण भाग भांडवलाच्या 1.02 टक्के आहे.
ब्रोकरेज हाऊस शेरखानच्या तज्ञांच्या मते, फेडरल बँकेचे शेअर्स काही महिन्यात 170 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. म्हणून ब्रोकरेज फर्मने फेडरल बँक शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीज फर्मने फेडरल बँक स्टॉकवर 175 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे.
सप्टेंबर 2023 तिमाहीत या बँकेच्या शेअरने जबरदस्त कामगिरी केली होती. या तिमाहीत फेडरल बँकेने 954 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. वार्षिक आधारावर फेडरल बँकेचा निव्वळ नफा एकूण 35.56 टक्के वाढला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Federal Bank Share Price NSE 06 December 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं