Federal Bank Share Price | झुनझुनवाला कुटुंबाचा खास शेअर! फेडरल बँकचे मल्टिबॅगर शेअर, बँक FD पेक्षा अनेक पटीत परतावा मिळेल

Federal Bank Share Price | नुकताच फेडरल बँकने आपले जून तिमाहीचे आर्थिक जाहीर केले आहे. चालू आर्थिक वर्षाच्या जून 2023 मध्ये संपलेल्या पहिल्या तिमाहीत फेडरल बँकेने 29 टक्क्यांच्या वाढीसह 854 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. कर्ज कपातीमुळे फेडरल बँकेच्या निव्वळ नफ्यात जबरदस्त वाढ झाली आहे. (Federal Bank Share)
या खाजगी क्षेत्रातील बँकेने मागील वर्षीच्या याच तिमाहीत फेडरल बँकने 661 कोटी रुपये निव्वळ नफा नोंदवला होता. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये फेडरल बँक स्टॉक 5.51 टक्के घसरणीसह 126.80 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. तर आज शुक्रवार दिनांक 14 जुलै 2023 रोजी फेडरल बँक स्टॉक 1.30 टक्के वाढीसह 128.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Federal Bank Net Banking)
दिग्गज गुंतवणुकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी देखील फेडरल बँकमध्ये मोठी गुंतवणुक केली आहे. त्यांनी बँकेचे 7 कोटींहून अधिक स्टॉक धारण केले आहेत. सेबीला दिलेल्या माहिती बँकेने माहिती दिली होती की, तिचे एकूण उत्पन्न 5,757 कोटी रुपयेवर पोहचले आहेत. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीने 4,081 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. फेडरल बँकेचे व्याज उत्पन्न 3,629 कोटी वरून वाढून 5,025 कोटी रुपयेवर पोहचले आहेत.
फेडरल बँकेने आपल्या आर्थिक नि कालात माहिती दिली आहे की, बँकेच्या मालमत्तेचा दर्जाही सुधारला असून बँकेची ढोबळ अनुत्पादक मालमत्ता जून 2022 मध्ये 2.69 टक्क्यांवरून कमी होऊन जून 2023 मध्ये 2.38 टक्क्यांवर पोहचली आहे. त्याचप्रमाणे फेडरल बँकेचा निव्वळ एनपीए देखील 0.94 टक्के वरून कमी होऊन 0.69 टक्के नोंदवली गेली आहे. तथापि फेडरल बँकेचे भांडवल पर्याप्तता प्रमाण 14.57 टक्क्यांवरून घसरून 14.28 टक्क्यांवर आले आहेत, ही चिंतेची बाब मानली जात आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Federal Bank Share Price today on 14 July 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं