GMR Power Share Price | 43 रुपयाचा शेअर तेजीत, एका महिन्यात दिला 22 टक्के परतावा, लवकरच मल्टिबॅगर?

GMR Power Share Price | जीएमआर पॉवर अँड अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जबरदस्त तेजीत वाढत होते. बुधवारी जीएमआर पॉवर अँड अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर 5 टक्क्यांच्या वाढीसह 42 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
जीएमआर पॉवर अँड अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअर्सने मागील एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना 22 टक्के परतावा कमावून दिला आहे. सध्या (23 November 2023) शेअर 4.90% वाढीसह 43.90 रुपयांवर ट्रेड करत आहे.
22 नोव्हेंबर 2023 रोजी स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये कंपनीने कळवले आहे की, स्टॉक अधिग्रहणामुळे GMR पॉवर कंपनीचे GMR एनर्जी कंपनीमधील स्टेक 57.7 टक्केवर आले आहे. सध्या GMR एनर्जी कंपनीचे 86.9 टक्के भाग भांडवल जीएमआर पॉवर अँड अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडे किंवा तिच्या उपकंपनीकडे आहे. या सकारात्मक बातमीमुळे जीएमआर पॉवर अँड अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत.
जीएमआर एनर्जी कंपनीची स्थापना 10 ऑक्टोबर 1996 रोजी करण्यात आली होती. ही कंपनी आपल्या उपकंपन्यांद्वारे वीज प्रकल्पांचा विकास, संचालन आणि देखभाल, वीज निर्मिती, पारेषण, वितरण आणि व्यापार संबंधित व्यवसाय करते.
सप्टेंबर 2023 मध्ये संपलेल्या तिमाहीत GMR पॉवर कंपनीची विक्री वार्षिक आधारावर 60 टक्क्यांच्या घसरणीसह 627 कोटी रुपयेवर आली आहे. तर कंपनीचा ऑपरेटिंग नफा वार्षिक 89 टक्क्यांच्या वाढीसह सप्टेंबर तिमाहीत 108 कोटी रुपयेवर आला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | GMR Power Share Price NSE 23 November 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं