GNA Axles Share Price | मालामाल शेअर! जीएनए एक्सल्स शेअर्स गुंतवणुकदारांवर फ्री बोनस शेअर्सची बरसात, संधीचा फायदा घेणार?

GNA Axles Share Price | सध्या जर तुम्ही मोफत बोनस शेअर्सचा लाभ घेऊ इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. जीएनए एक्सल्स कंपनी आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. शुक्रवाच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जीएनए एक्सल्स कंपनीचे शेअर्स एक्स-बोनस स्टॉक म्हणून ट्रेड करत होते. नुकताच जीएनए एक्सल्स कंपनीने आपल्या विद्यमान पात्र शेअरधारकांना एका शेअरवर एक बोनस शेअर मोफत देण्याची घोषणा केली होती.
गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जीएनए एक्सल्स कंपनीचे शेअर्स 3.29 टक्क्यांच्या वाढीसह 1024.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 1 सप्टेंबर 2023 रोजी जीएनए एक्सल्स कंपनीचे शेअर्स 7.51 टक्के वाढीसह 547.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या दोन्ही किमतीत एवढं फरक होण्याचे कारण म्हणजे, एक्स बोनस तारखेच्या दिवशी शेअरच्या किमतीत सुधारणा झाली होती. आणि 1 : 1 या बोनस शेअर्स प्रमाणानुसार शेअरची किंमत निम्मी झाली.
11 जुलै 2023 रोजी जीएनए एक्सल्स कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली होती. या बैठकीत कंपनीने आपल्या पात्र गुंतवणूकदारांना 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल एक बोनस शेअर मोफत देण्याचा निर्णय घेतला होता. बोनस शेअरची पात्रता निश्चित करण्यासाठी जीएनए एक्सल्स कंपनीने 2 सप्टेंबर 2023 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केला होता. शनिवारी शेअर बाजार बंद असल्याने 1 सप्टेंबर 2023 ही तारीख महत्त्वाची ठरते.
मागील एका वर्षात जीएनए एक्सल्स कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 40 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 12 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 1064.90 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | GNA Axles Share Price today on 02 September 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं