Godawari Power Share Price | शॉर्ट टर्म मध्ये मोठी कमाई करा, या शेअरने 1 महिन्यात दिला 25% परतावा, संधी सोडू नका

Godawari Power Share Price | गोदावरी पॉवर अँड इस्पात कंपनीचे शेअर्स मंगळवारी 9 टक्के वाढीसह 1179.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये भरघोस तेजी पाहायला मिळाली आहे. गोदावरी पॉवर अँड इस्पात कंपनीच्या शेअरमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीच्या संचालक मंडळाने 301 कोटी रुपये मूल्याच्या बायबॅकला मान्यता दिली आहे. ( गोदावरी पॉवर अँड इस्पात कंपनी अंश )
मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 25 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे शेअर्स 437.15 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवरून जवळपास 160 टक्के वाढले आहे. आज बुधवार दिनांक 19 जून 2024 रोजी गोदावरी पॉवर अँड इस्पात स्टॉक 2.05 टक्के वाढीसह 1,111.25 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
15 जून रोजी गोदावरी पॉवर अँड इस्पात कंपनीच्या संचालक मंडळाने 1400 रुपये दराने 21.5 लाख इक्विटी शेअर्सचे बायबॅक करण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. यासाठी कंपनीला 301 कोटी रुपये निधी राखीव ठेवला आहे. बायबॅकमध्ये परत खरेदी करण्यात येणारे शेअर्स एकूण भाग भांडवलाच्या 1.64 टक्के आहेत. कंपनीने बायबॅक ऑफरची रेकॉर्ड तारीख म्हणून शुक्रवार दिनांक 28 जून 2024 हा दिवस निश्चित केला आहे.
गोदावरी पॉवर अँड इस्पात ही कंपनी मुख्यतः लोहखनिजाचे उत्खनन आणि लोह धातूचे गोळे, स्पंज स्टील, स्टील बिलेट्स, वायर, रॉड्स, एचबी वायर आणि फेरो मिश्र धातु तसेच वीज निर्मितीचा व्यवसाय करते. या कंपनीकडे अरी डोंगरी खाण आणि बोरिया टिबू खाण या दोन खाणी आहेत. गोदावरी पॉवर अँड इस्पात कंपनीचे एकूण बाजार भांडवल 15,300 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Godawari Power Share Price NSE Live 19 June 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं