Govt Employees Promotion Rule | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी बढतीबाबत अलर्ट! नियम बदलला, ग्रेडनिहाय नोटोफिकेशन जारी

Govt Employees Promotion | केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ होणार आहे, पण त्याआधीच सरकारने कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीबाबत मोठी बातमी दिली आहे. याचा फायदा अशा कर्मचाऱ्यांना होणार आहे जे सातव्या वेतन आयोगांतर्गत वेतन घेत आहेत आणि केंद्र सरकारच्या अखत्यारित आहेत. पदोन्नतीसंदर्भातील पदोन्नती नियमांमध्ये सरकारने बदल केले असून, त्याबाबत अधिसूचना काढून माहिती देण्यात आली आहे.
महागाई भत्त्यात लवकरच होणार वाढ
केंद्र सरकार लवकरच कर्मचाऱ्यांना वाढीव डीएची भेट देऊ शकते. सप्टेंबरमध्ये होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाई भत्त्याची घोषणा होऊ शकते. याचा फायदा लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार आहे. यावर्षी दुसऱ्यांदा सरकार महागाई भत्त्याची घोषणा करणार असून, त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे. वाढीव महागाई भत्ता 1 जुलै 2023 पासून लागू होईल.
ग्रेडनिहाय प्रसिद्ध झालेली यादी
पदोन्नतीचे निकष प्रत्येक स्तरानुसार निश्चित करण्यात आले आहेत. यासोबतच निवेदनही देण्यात आले आहे. याशिवाय ग्रेडनिहाय यादीही प्रसिद्ध करण्यात आली आहे.
केंद्र सरकारने दिली माहिती
संरक्षण मंत्रालयातील संरक्षण नागरी कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीची यादी जाहीर करण्यात आली आहे. किमान सेवेच्या नियमात बदल करण्यात आला आहे.
अधिसूचना जारी
मीडिया रिपोर्टने दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने संरक्षण मंत्रालयांतर्गत संरक्षण कर्मचाऱ्यांसाठी सुधारित निकष निश्चित केले आहेत. संरक्षण मंत्रालयाकडून यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेत पदोन्नतीच्या पात्रतेची माहिती देण्यात आली आहे.
किती अनुभवाची गरज भासणार
सर्व्हिस फॉर प्रमोशनच्या यादीनुसार लेव्हल 1 ते 2 आणि 2 ते 3 पर्यंतच्या कर्मचाऱ्यांना 3 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. लेव्हल २ ते ४ साठी ८ वर्षांचा अनुभव असावा. त्याचबरोबर लेव्हल 3 ते 4 साठी 5 वर्षांचा अनुभव असावा. लेव्हल १७ पर्यंतच्या कर्मचाऱ्यांना १ वर्षाचा आणि लेव्हल ६ ते ११ पर्यंतच्या कर्मचाऱ्यांना १२ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. त्या आधारे कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात येणार आहे.
News Title : Govt Employees Promotion Rule alert 7th pay commission update 12 September 2023 Marathi news.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं