GTL Share Price | GTL पेनी शेअर 45 रुपयांची पातळी स्पर्श करणार, कंपनीला मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळाला - BSE: 513337

GTL Share Price | स्टॉक मार्केट मधील अस्थिरता अजूनही कायम आहे. जागतिक स्तरावरील घडामोडींमुळे मागील काही दिवसांपासून शेअर बाजार (BSE: 513337) अस्थिर झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे गुंतवणूकदार सुद्धा चांगला परतावा देतील अशा शेअर्सच्या शोधात आहेत. मागील काही महिन्यांपासून अनेक शेअर्स परतावा देतं आहेत आणि त्यात काही पेनी शेअर्सचा सुद्धा समावेश आहे. असाच एक पेनी शेअर भविष्यात मालामाल करू शकतो. या शेअरची 52 आठवड्यांची किंमत 45 रुपये होती. (गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनी अंश)
पेनी शेअर मालामाल करणार
गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनी शेअर तेजीत येण्याचे संकेत आहेत. गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनी शेअर सध्या 13 रुपयांवर ट्रेड करतोय. गुरुवार 17 ऑक्टोबर रोजी हा शेअर 1.97 टक्के घसरून 13.4 रुपयांवर पोहोचला होता. शुक्रवार 18 ऑक्टोबर रोजी हा शेअर 1.93 टक्के घसरून 13.20 रुपयांवर पोहोचला होता. मागील काही दिवसांपासून हा शेअर अप्पर सर्किट हिट करतोय.
कंपनीने एक्स्चेंज फायलिंगमध्ये दिली माहिती
गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीने एक्स्चेंज फाइलिंगमध्ये महत्वाची अपडेट दिली आहे. गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीने दिलेल्या माहितीनुसार कंपनीला रिलायन्स इंडस्ट्रीज ग्रुपकडून ३१ कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. कॉन्ट्रॅक्ट मिळाल्याच्या तारखेपासून दोन महिन्यांत हा कॉन्ट्रॅक्ट पूर्ण करायचा आहे अशी माहिती गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीने दिली आहे. याआधी कंपनीला रिलायन्स इंडस्ट्रीज ग्रुपकडून २९ कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला होता. तो कॉन्ट्रॅक्ट कंपनीने वेळेत पूर्ण केला आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज ग्रुप महत्वाचा क्लाईंट
‘रिलायन्स इंडस्ट्रीज ग्रुपचा गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीवरील विश्वास अधिक दृढ झाल्याचं कंपनीने म्हटले आहे. भविष्यात देखील आम्हाला रिलायन्स इंडस्ट्रीज आणि इतर प्रमुख ग्राहकांकडून कॉन्ट्रॅक्ट मिळतील अशी अपेक्षा गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीने व्यक्त केली आहे.
गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीने अलीकडेच QIP च्या माध्यमातून ५० कोटी रुपये उभारले आहेत. त्यासाठी गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीने ११.५० रुपये प्रति शेअर दराने ४३.४८ दशलक्ष इक्विटी शेअर्स जारी केले होते.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | GTL Share Price 18 October 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं