Gulshan Polyols Share Price | मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या गुलशन पॉलिओल्स शेअरवर फ्री बोनस शेअर्स मिळणार, रेकॉर्ड डेट पाहून फायदा घ्या
Deprecated: Function wp_make_content_images_responsive is deprecated since version 5.5.0! Use wp_filter_content_tags() instead. in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114
Highlights:
- Gulshan Polyols Share Price
- रेकॉर्ड तारीख पुढील आठवड्यात
- गुलशन पॉलिओल्स शेअर्स बोनस रेकॉर्ड डेट
- मल्टीबॅगर परतावा दिला

Gulshan Polyols Share Price | गुलशन पॉलिओल्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 1200 टक्के परतावा कमावून दिला आहे. आता ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना 1 : 5 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. गुलशन पॉलिओल्स लिमिटेड कंपनीने या बोनस इश्यूची रेकॉर्ड तारीख जाहीर केली आहे.
रेकॉर्ड तारीख पुढील आठवड्यात
एक्स बोनस तारीख आणि रेकॉर्ड तारीख पुढील आठवड्यात असेल, याची गुंतवणूकदारांनी नोंद घ्यावी. शुक्रवार दिनांक 16 जून 2023 रोजी गुलशन पॉलिओल्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.73 टक्के वाढीसह 278.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
गुलशन पॉलिओल्स शेअर्स बोनस रेकॉर्ड डेट
गुलशन पॉलिओल्स कंपनीने आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. यासाठी कंपनी आपल्या विद्यमान पात्र गुंतवणूकदारांना प्रत्येक 5 शेअर्सवर 1 बोनस शेअर मोफत देणार आहे. कंपनीने बोनस जारी करण्याची रेकॉर्ड तारीख म्हणून 21 जून 2023 हा दिवस निश्चित केला आहे. रेकॉर्ड तारीखच्या दिवशी ज्या लोकांचे नाव कंपनीच्या रेकॉर्ड बुकमध्ये असेल त्यांना कंपनी प्रत्येक 5 शेअर्सवर 1 बोनस शेअर मोफत देईल.
मल्टीबॅगर परतावा दिला
गुलशन पॉलिओल्स लिमिटेड स्टॉकने COVID-19 नंतर आपल्या शेअर धारकांना मल्टीबॅगर परतावा दिला होता. मागील 3 वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 22 रुपयेवरून वाढून 280 रुपयेवर गेली आहे. मागील 3 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने लोकांना 45 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 299.80 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 193 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Gulshan Polyols Share Price today on 17 June 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं