HAL Share Price | आता नाही थांबणार या डिफेन्स कंपनीचा शेअर, गुंतवणूकदारांची मोठी कमाई होणार - NSE: HAL

HAL Share Price | डिफेन्स क्षेत्रातील हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी संबंधित मोठी अपडेट समोर आली आहे. केंद्र सरकारकडून या PSU कंपनीला (NSE: HAL) ‘महारत्न’चा दर्जा देण्यात आला आहे. हा दर्जा मिळवणारी ही १४ वी PSU कंपनी ठरली आहे. सार्वजनिक उपक्रम विभागाने सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली आहे. केंद्र सरकारच्या अर्थमंत्रालयाने या कंपनीला ‘महारत्न’ दर्जा देण्यास मान्यता दिली आहे. (हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी अंश)
सार्वजनिक उपक्रम विभागाने सोशल मीडियावर माहिती देताना म्हटले आहे की, केंद्रीय अर्थमंत्र्यालयाने हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीला महारत्न दर्जा देण्यास मान्यता दिली आहे. पहिल्यांदा इंटर-मिनिस्ट्रीअल समितीने हा प्रस्ताव दिला होता. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीची वार्षिक उलाढाल 28162 कोटी रुपये इतकी आहे. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीला आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 7595 कोटी रुपये निव्वळ नफा झाला होता. सोमवार 14 ऑक्टोबर रोजी हा शेअर 1.39 टक्के वाढून 4,508 रुपयांवर पोहोचला होता.
महारत्न दर्जा मिळाल्याने फायदे कोणते?
केंद्र सरकारकडून महारत्न दर्जा मिळण्याचे अनेक फायदे होतात. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीला आता निर्णय घेताना अधिक स्वातंत्र्य मिळणार आहे. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी आता केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय एकाच प्रकल्पात ५,००० कोटी रुपये किंवा नेटवर्थच्या १५% गुंतवणूक करू शकते. इतर महारत्न कंपन्यांप्रमाणेच हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीलाही आता देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये विलीनीकरण, अधिग्रहण आणि धोरणात्मक गुंतवणुकीचे स्वातंत्र्य मिळणार आहे.
देशात कोणत्या कंपन्यांना महारत्नाचा दर्जा मिळाला आहे?
* एनटीपीसी लिमिटेड (एनटीपीसी)
* ओएनजीसी
* स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड
* भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड
* इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड
* हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड
* कोल इंडिया लिमिटेड
* गेल इंडिया लिमिटेड
* भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड
* पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड
* आरईसी लिमिटेड
* ऑइल इंडिया लिमिटेड
* पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड
* हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | HAL Share Price 14 October 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं